व्हीनस चेस अॅकॅडमी आयोजित तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोशिएशन व ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित दहाव्या महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले.
व्हीनस चेस अॅकॅडमी आयोजित तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोशिएशन व ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित दहाव्या महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऑल मराठी चेस असोशिएशनचे अध्यक्ष आमदार डॉ. परिणय फुके, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे रवींद्र डोंगर तसेच बुद्धिबळप्रेमी किरीट बन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते. एलआयसी आणि अंकित जेम पुरस्कृत वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) माउंट लिटेरा स्कूल इंटरनॅशनलच्या सभागृहामधील बुद्धिबळ स्पर्धेत भारतासह १४ देशांचे नामवंत बुद्धिबळपटू सहभागी झाले आहे. पहिल्या टेबलावर डावाची सुरुवात मुथैया अलने घोडय़ाच्या चालीने रचली आणि सामना किंग्ज इंडियन डिफेन्स पद्धतीमध्ये रुपांतरित झाला. ३०व्या चालीला सर्व सोंगटय़ांची अदलाबदल होऊन पटावर दोन हत्ती व वेगळय़ा रंगाचे उंट राहिले. अखेर ४०व्या चालीला दोघांनी सामना बरोबरीत सोडवून दुस-या फेरीनंतर १.५ गुणांची कमाई केली. दुस-या टेबलावर ग्रँडमास्टर दीप्तयान घोषने वजिराच्या पुढील प्याद्याने डावाची सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना कार्तिक वेंकटरमणने किंग्ज इंडियन डिफेन्स पद्धतीचा वापर केला. दोघांनी आक्रमक खेळ करीत ४०व्या चालीला बरोबरीचे संकेत दिले. परंतु ४१व्या चालीला कार्तिकने मोठी घोडचूक केली आणि प्रतिस्पध्र्याला आपला उंट फुकटात बहाल केला. तेथेच कार्तिकचे डावावरचे नियंत्रण पूर्णपणे बोथट झाले आणि त्याने डाव सोडून दिल्याने दीप्तयानला विजयी केले.
मुंबई – तझाकिस्तानचा ग्रँडमास्टर आणि अव्वल मानांकित अमोनॅटोव्ह फारुखला (इलो २६३२) तामिळनाडूचा बुद्धिबळपटू मुथैया अल याने
(इलो २२९७) बरोबरीत रोखले आणि दहाव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमधील ‘अ’ विभागीय गटाच्या दुस-या फेरीत धक्कादायक कामगिरी नोंदवली. दुस-या टेबलवर भारताचा ग्रँडमास्टर आणि दुसरा सीडेड दीप्तयान घोषने (इलो २५६९) तामिळनाडूचा फिडेमास्टर कार्तिक वेंकटरमणचा (इलो २३१७) शेवटच्या क्षणी पराभव केला.