अक्षय कुमार आणि श्रुती हसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गब्बर’ हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तीन एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबई – अक्षय कुमार आणि श्रुती हसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गब्बर’ हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तीन एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मेरी कोम या यशस्वी चित्रपटानंतर वाएकॉम १८ मोशन आणि भन्साळी प्रॉडक्शनचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. क्रिश यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रामणा या चित्रपटाचा हा रिमेक आहे.
रावडी राठोड या चित्रपटानंतर भन्साळी आणि अक्षय कुमार पुन्हा एकत्र काम करत आहेत.