अँक्सिस बँकेत रोकड जमा करण्यासाठी आलेल्या बॅंकेच्या कॅश वॅनवर बुधारी दुपारी दरोडा घालून साडेतीन कोटींची रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले होते.
वसई – नालासोपारा पश्चिमेला बबली आपार्टमेंन्ट मधील अँक्सिस बँकेत रोकड जमा करण्यासाठी आलेल्या बॅंकेच्या कॅश वॅनवर बुधारी दुपारी दरोडा घालून साडेतीन कोटींची रक्कम लुटून दरोडेखोर पसार झाले होते.
मात्र दिवसा-ढवळया घातलेल्या या दरोडयामुळे अटक होण्याच्या भितीने दरोडेखोरांनी रोकड असलेली कॉलिस गाडी विरार मनवेलपाडा येथील दर्शन नगरच्या स्त्यावर सोडली व तेथून पसार झाले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचले आणि गाडीसह रक्कमेची पेटी ताब्यात घेतली.
नालासोपारा पश्चिमेला बबली अपार्टमेंट येथील मुख्य रस्त्याजवळील अँक्सिस बॅंकेत सिक्युरिटी ट्रान्स कंपनीची गाडी चारच्या सुमारास आली असता पाठिमागून एका हिरव्या रंगाच्या क्वालीस गाडीतून पाच ते सहाजण उतरले. गाडीतून रोकड बाहेर काढताच त्यांनी गाडीतील कर्मचा-यांना मारहाण केली व रोकड असलेली पूर्ण पेटी कॉलिसमध्ये ठेऊन फरार झाले होते. परंतु या घटनेची वा-यासारखी बातमी पसरल्याने घाबरलेल्या दरोडेखोरांनी गाडी रस्त्यात सोडून पसार झाले.