‘आरे आंदोलन’ प्रकरणी आदित्य ठाकरेंना राष्ट्रीय बालहक्क आयोगाची नोटीस

Share

मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेडच्या विरोधात काल आंदोलन केले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती पण आदित्य ठाकरे यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या आंदोलनात लहान मुले पोस्टर घेऊन सहभागी होते यामुळे राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरे कारशेडच्या विरोधातील आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केली आहे अशी तक्रार एका संस्थेने केली असून त्यानंतर ठाकरेंना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान काल ‘आरे बचाव’ हे आरे येथील जंगल वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. यामध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात लहान मुलांना सहभागी होण्याची परवानगी नसताना लहान मुलांचा या आंदोलनात सहभाग होता.

यावर सह्याद्री राईट्स या संस्थेने आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिस आणि राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यावर बालहक्क आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना या नोटीसीत देण्यात आली आहे.

Recent Posts

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

39 mins ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

56 mins ago

Paresh Rawal : मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी!

अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…

1 hour ago

IT Raid : अबब! पलंग, कपाट, पिशव्या आणि चपलांच्या बॉक्समध्ये दडवलेले तब्बल १०० कोटी!

दिल्लीत आयकर विभागाची मोठी कारवाई नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात (Election period) काळा पैसा सापडण्याच्या…

2 hours ago

Loksabha Election : देशात आणि राज्यात १ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच... मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर…

5 hours ago

HSC exam results : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! उद्या होणार निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (HSC and SSC Board) घेतल्या जाणार्‍या…

5 hours ago