नाम हे परमात्मस्वरूप

Share

ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळया नावांत फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे, तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की, भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी, नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणही आहे.

तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे, म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्याचा भावार्थ एकच आहे.

अन्नाला स्वत:ची चव असते त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वत:ची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत; परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते; त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता-घेता शेवटी स्वत:ला विसरून जावे, हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे.

जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे, तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते; परंतु देहबुद्धी जसजशी कमी होत जाईल, तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे, असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की, प्राणाबरोबर ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे.

Recent Posts

Kareena Kapoor Khan : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची करीना कपूरला नोटीस!

सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश; काय आहे प्रकरण? भोपाळ : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर…

3 mins ago

Narhari Zirwal : दादा की काका? नरहरी झिरवाळ यांनी केला ‘त्या’ व्हायरल फोटोमागील खुलासा

मविआच्या नेत्यांसोबत का दिसले झिरवाळ? दिंडोरी : सध्या देशभरात लोकसभेची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे.…

52 mins ago

Devendra Fadnavis : ….आणि म्हणूनच पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही!

'अमोल कोल्हे केवळ नाटक करणारा माणूस, अशांना जनता त्यांची योग्य जागा दाखवेल' देवेंद्र फडणवीस यांचा…

59 mins ago

Abdu Rozik : ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! कोण आहे होणारी पत्नी?

अबुधाबी : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. त्याची…

2 hours ago

Sitapur Murder Case : धक्कादायक! तरुणाने स्वत:च्याच कुटुंबियांची केली घृणास्पद हत्या

आईवर गोळ्या झाडून, पत्नीला हातोड्याचा मार तर मुलांना गच्चीवरून फेकले! सीतापूर : उत्तर प्रदेशातील सीतापूर…

2 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दि. ११ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र मार्गशीर्ष १०.१४ नंतर आर्द्रा योग…

8 hours ago