अंबड औद्योगिक वसाहतीत रिक्षा चालकाचा खून, अल्पवयीन संशयितासह तीन जण ताब्यात

Share

सिडको (प्रतिनिधी) – गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी दारू पिण्याच्या वादातून खून झाल्याची घटना ताजी असतानाच अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून केला आहे याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन न जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ वय 38 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी दिनांक 10 रोजी रात्री दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर गाडगीळ यांच्या डोक्यात दांडूका मारल्याने गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी गाडगीळ याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

या प्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार ढाकणे व पथक यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या तिघांना ताब्यात घेतले आहे. मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत. गाडगीळ व कांबळे हे दोघेही रिक्षा चालक आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

Tags: murder

Recent Posts

मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…

31 mins ago

खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसण्याची सवय लावा, होतील हे बरेच फायदे

मुंबई: जमिनीवर ज्या पद्धतीने लोक बसतात ते एक प्रकारचे आसन असते. यामुळे शरीरास अनेक फायदे…

54 mins ago

पुण्यातील ” हिट अँड रन ” प्रकरणी कुणालाही सोडणार नाही

पुणे : पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे…

1 hour ago

Anant Ambani: ३०० व्हीआयपी पाहुण्यांसोबत क्रूझवर होणार अनंत अंबानीचे दुसरे प्री वेडिंग

मुंबई: बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन…

2 hours ago

आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; योगी आदित्यनाथांचे यांचा आरोप

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आम…

2 hours ago

Salary Saving : पैशांची उणीव भासतेय? सेव्हिंगचा ‘हा’ फॉर्म्युला वापरा

खर्चानंतरही भासणार नाही पैशांची अडचण! मुंबई : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या आपल्या भविष्याची चिंता असते.…

4 hours ago