Mumbai Metro : संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

Share

मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण

मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण

मुंबई : डी एन नगर ते मंडाळे दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या (Mumbai Metro) मेट्रो मार्ग २ ब च्या पियर्स आणि पियर कॅपची उभारणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू असून देखील एमएमआरडीएच्या मेट्रो टीमने चेंबूर येथील मुंबई मेट्रो मार्ग २ब च्या पॅकेज सी १०२ मध्ये पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे. या मर्गिकेची कामे ३ पॅकेज मध्ये सुरू आहे.

जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्स ची उभारणी करण्यात टीम ला यश आले असून आत्तापर्यंत ८३९ पैकी ४५० पियर कॅप्स ची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्यस्थितीतमेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. सारी मुंबई थकून शांतपणे विसावत असते तेव्हा मुंबईतील मेट्रोची टीम आपले काम अविरत आणि शांतपणे करते.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागामार्फत काही ठिकाणी रेड तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईची दळण वळण व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या त्रासमुक्त प्रवासासाठी प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पांची कामे मुसळधार पावसातही अविरत सुरू आहेत. मेट्रोची कामे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी केली जातात. ज्यावेळेस मुंबई थांबलेली असते त्यावेळेस मेट्रोची टीम ही मुंबईकरांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत असते.

“मुसळधार पावसा सारख्या आव्हानात्मक हवामानात ही, मेट्रोची टीम मेट्रोची सर्व कामे उल्लेखनीय वेगाने करत आहे. ट्रॅफिक समस्यांचे निराकरण करताना पायलिंग, पाइल कॅप, खांबाचे काँक्रीटीरण आणि पिअर कॅपच्या कामांदरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करून ही कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी एमएमआरडीए वचनबद्ध आहे.” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी, भा. प्र.से. म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Tags: mumbai metro

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago