हायकोर्टाने नाकारली मलिक-देशमुखांना राज्यसभेसाठी मतदानाची परवानगी

Share

मुंबई, (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. गुरुवारी सत्र न्यायालयाने दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली होती. तोच निर्णय वरिष्ठ न्यायालयाने आजही कायम ठेवला.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सहा जागांवर सात उमेदवार रिंगणात आहेत. सहावा उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच राजकीय पक्षांकडे नसल्याने एक-एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहान पक्ष आणि अपक्षांचीही मदत घेण्यात येत आहे.

मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली. त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात तातडीने आव्हान देण्यात आले. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मतदान करण्याची परवानगी नाकारली.

ही याचिका सुनावणीसाठी योग्यच नाही असा दावा सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या महाधिवक्ता अनिल सिंग यांनी न्यायालयात केला. त्यावर नवाब मलिकांच्या वकिलांनी युक्तीवाद करताना म्हटले की, घटनात्मक अधिकार आहे तोच आम्ही मागतोय. आता मलिक कोठडीत नसून रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांना फक्त काही वेळ दिला तर त्यांना त्यांचा घटनात्मक अधिकार वापरता येईल.

मलिक यांच्यावतीने युक्तीवादाकरता ज्येष्ठ वकील अमित देसाई, तर अनिल देशमुख यांच्यावतीने युक्तीवादाकरता आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला. तर सरकारी पक्षाची बाजू महाधिवक्ता अनिल सिंग यांनी मांडली.

Recent Posts

काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढावाच लागेल…

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया घडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर या दहशतवादी कारवायांच्या घटनांमध्ये वाढ…

2 hours ago

वाढती उष्णता, ढासळणारे अर्थकारण

मिलिंद बेंडाळे, वन्य प्राणी आणि पर्यावरण अभ्यासक वाढत्या उष्णतेमुळे अवघे जग आजारी पडण्याची शक्यता आहे.…

2 hours ago

शाळेतील पहिला दिवस…

रवींद्र तांबे आपल्या राज्यात उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भवगळता १५ जूनपासून शाळा सुरू होत आहे. म्हणजे आज…

3 hours ago

T-20 world cup 2024: USA आणि आयर्लंडचा सामना पावसामुळे रद्द, पाकिस्तानला मोठा झटका

मुंबई: १४ जूनला होणारा यूएसए विरुद्ध आयर्लंड हा सामना खराब हवामान आणि पावसामुळे रद्द करण्यात…

4 hours ago

Vastu Tips: घराच्या या कोपऱ्यात चुकूनही ठेवू नका भांडी, होणार नाही भरभराट

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेची भांडी ठेवणे शुभ मानले गेले आहे. पितळ अनेक गोष्टीत लाभ देतात.…

5 hours ago

Litchi: लिची खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: लिची स्वाद आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी लोक लिची खातात. काही फळे…

6 hours ago