मुंबईचे कर्णधारपद ‘पृथ्वी शॉ’कडे

Share

मुंबई  : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा लवकरच सुरू होणार असून मुंबईचा सलामीचा सामना १३ जानेवारीला रंगणार आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचे नेतृत्व धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ कडे सोपवण्यात आले आहे.
४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईचा एलिट क-गटात समावेश आहे. मुंबईचा सलामीचा सामना १३ जानेवारीला महाराष्ट्राशी रंगणार आहे,

तर दुसरी लढत २० जानेवारीपासून दिल्लीशी आहे. मुंबईच्या संघात अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरेसह सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान, अरमान जाफर, आकर्शित गोमेल आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी स्थान मिळवले आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीसह मोहित अवस्थी, शाम्स मुलानी, शशांक अत्तार्डे, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर यांच्यावर मुंबईच्या गोलंदाजीची मदार असेल.

मुंबईचा संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्शित गोमेल, अरमान जाफर, सरफराज खान, सचिन यादव, आदित्य तरे (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलान, तनुष कोटियन , प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.

Recent Posts

Cyber Crime : मित्रासोबतचे वाद मिटवण्याच्या नादात ज्योतिषाने लावला चुना!

जाणून घ्या नक्की प्रकरण काय? मुंबई : देशभरात मोठ्या प्रमाणात सायबर जाळे पसरत आहे. कधी…

40 mins ago

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार…

59 mins ago

PM Modi : मोदींच्या सभेला गर्दी; लोखंडे आणि विखेंचा विजय निश्चित

अहमदनगर : शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay…

1 hour ago

Kolhapur news : कोल्हापूरच्या कटाळे कुटुंबावर काळाचा घाला! तिघांचा नदीत बुडून मृत्यू

नदीवर कपडे धुण्यासाठी गेले आणि... नेमकं काय घडलं? कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम…

2 hours ago

Majgaon News : मजगांव पुलाला झाडाझुडपांचा विळखा; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

अलिबाग : मुरुड जंजिरा परिसरात अलिबाग -मुरुड रस्त्यावर अंदाजे ५० वर्षे जुना असणाऱ्या पुलावर पर्यटकांची…

2 hours ago

Government Job : युवकांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतील ‘या’ मोठ्या संस्थेत नोकरीची संधी

बीएमसी आणि टाटा मेमोरीयलमध्ये मेगाभरती असा करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर मुंबई : सध्या अनेकजण…

2 hours ago