Murder: कर्नाटकात दिवसाढवळ्या घरात घुसून आई आणि तीन मुलांची हत्या

Share

बंगळरू: कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात एक महिला आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी रविवारी याची माहिती दिली. या चार जणांचे मृतदेह घरात आझळले. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोराने सर्वात आधी महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या केली. मात्र तेव्हाच महिलेचा १२ वर्षांचा मुलगा घरात आला. त्याला पाहताच हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला आणि हत्या केली.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मृत व्यक्तींच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याने जेव्हा किंकाळ्यांचा आवाज ऐकला तेव्हा तो तेथे आला मात्र हल्लेखोराने त्यालाही धमकावले. महिलेच्या सासूवरही चाकू हल्ला. तिच्यावरही चाकूने वार करण्यात आले. दरम्यान, तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लुबाडण्याच्या हेतूने नाही झाली हत्या

उडुपी पोलीस अधीक्षकांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले, आज नेजर गावाजवळ चार लोकांची हत्या करण्यात आली. हसीना आणि तिच्या तीन मुलांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या हत्येचा हेतू चोरीचा नव्हता. तर वेगळाच काही आहे. आम्हाला शेजाऱ्यांकडून सकाळी १० वाजता हत्येची माहिती मिळाली. शेजाऱ्यांनी या घरातून ओरडण्याचा तसेच किंकाळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर लगेचच पोलिसांना फोन केला.

Recent Posts

IPL 2024: विराट कोहली की संजू सॅमसन? आज कोण मारणार बाजी

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४च्या हंगामात आज एलिमिनेटरचा सामना रंगत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स…

6 mins ago

Success Mantra: यशाचा सुंदर मार्ग, या ६ सवयींनी बदला आपले नशीब

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते मात्र यशाचा मार्ग काही सोपा नाही. अशा…

1 hour ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २२ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…

3 hours ago

मतदानाचा टक्का घसरला; कोण जबाबदार?

मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…

6 hours ago

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

7 hours ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

8 hours ago