आज मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

Share

मुंबई : पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी तसेच सिग्नल यंत्रणेची कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे – ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप -डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत.

सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मात्र १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील, तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर थांबवल्या जातील. पुढे मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत.

या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान अप- डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच डाऊन दिशेच्या काही गाड्या रद्द.

हार्बर रेल्वे – सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.

सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव करिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द. तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष सेवा.

Recent Posts

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…

5 hours ago

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…

6 hours ago

मराठी पाट्या लावण्यासाठी सक्ती का करावी लागते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…

7 hours ago

कामगारांना सुरक्षित वातावरण हवे

आशय अभ्यंकर, प्रख्यात अभ्यासक देश जागतिक पातळीवर विकासाच्या नवनवीन पायऱ्या पार करत असताना कामगारांची उत्तम…

7 hours ago

‘मॉरिशस रूट’ टाळण्यासाठी…

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार भारतातून मॉरिशसला निधी पाठवायचा, तेथे कंपनी स्थापन करायची आणि मग तो पैसा…

8 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, दिनांक २ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शुक्ल. चंद्रराशी मकर,…

9 hours ago