मध्य रेल्वेवर आज-उद्या मेगाब्लॉक

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत ४ आणि ५ जून रोजी मध्य रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

मध्य रेल्वे दादर स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज गर्डर काढण्यासाठी मेगाब्लॉक आहे. ठाकुर्ली स्थानकावरील एन-टाइप जुना फूट ओव्हर ब्रिज पाडण्यासाठी रात्रीची ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे. त्यामुळे ३ जून ते ४ जून २०२२ रोजी शुक्रवार आणि शनिवारी भायखळा – माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर ००.४० ते ०६.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

एक्सप्रेस गाड्यांमध्येही बदल करण्यात आला आहे. ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणार्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळवण्यात आली आहे. या गाड्या दादर येथे दोनवेळा थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन मेल/एक्स्प्रेस (२२१०५ इंद्रायणी एक्स्प्रेस) भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर येथे दोन वेळा थांबणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या/सुटणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील उपनगरीय लोकल गाड्या नियोजित थांब्यानुसार थांबणार आहेत. माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप/डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. शनिवार ४ ते ५ जून रोजीही मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री ००.४० ते ०५.४० पर्यंत भायखळा – माटुंगा डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

१२०५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दोनदा थांबणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन जलद मार्गावरील उपनगरीय सेवा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्या गाड्यांच्या नियोजित थांब्यांनुसार थांबणार आहेत.

शनिवारी ४ जून आणि रविवारी ५ जूनला ०१.१५ ते ०३.३५ पर्यंत कल्याण – दिवा अप आणि डाऊन जलद/धिम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.५१ वाजल्यापासून ००.२४ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

Recent Posts

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

1 hour ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

2 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

3 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

6 hours ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

9 hours ago