Marathwada Rain : मराठवाड्यातील बळीराजाला पिकांना घालावे लागतेय तांब्याने पाणी…

Share

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची दैन्यावस्था

मराठवाडा : पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर गेल्या महिन्याभरात मात्र पाऊस दडी मारुन बसला आहे. राज्यभरात पावसाच्या गैरहजेरीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस (Rain) झाल्याने किमान पेरण्या झाल्या. मात्र, आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे.

मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांत पीक सुकून चालले आहे. पावसाअभावी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी घेऊन पीकांच्या मुळांशी पाणी घालत आहेत. बळीराजाने प्रेमाने लावलेली त्याची रोपे सुकताना पाहून त्याचा जीव तीळतीळ तुटतोय पण पावसाने पाठ फिरवल्याने आता बळीराजाचं अख्खं कुटुंबच बादली, तांब्या हातात घेऊन रोजच्या वापरासाठीचं पाणी आपल्या बाळांना जगवण्यासाठी वापरत आहे. असंच चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावातही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे बळीराजा चिंतीत झाला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी २० दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने पिकांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते. परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहीरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोठे किती पाऊस पडला?

  • कोकण विभाग (२८ टक्के पाऊस) : सरासरी ७६६ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात २१७ मिलिमीटर पाऊस झाला.
  • नाशिक विभाग (२० टक्के पाऊस) : सरासरी १९७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४० मिलिमीटर पाऊस झाला.
  • पुणे विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी २४७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५४ मिलिमीटर पाऊस झाला.
  • औरंगाबाद विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी १९३ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४४ मिलिमीटर पाऊस झाला.
  • अमरावती (२९ टक्के पाऊस) : सरासरी २३१ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ६८ मिलिमीटर पाऊस झाला.
  • नागपूर (५५ टक्के पाऊस) : सरासरी ३४७ मिलिमीटर पाऊस पडतो, १९३ प्रत्यक्षात मिलिमीटर पाऊस झाला.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती: शिबानी जोशी ‘वैद्यकीय सेवेतून सामाजिक परिवर्तन’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन  १२ जानेवारी २००१ रोजी…

25 mins ago

झोपताना AC किती डिग्रीवर ठेवावा? जाणून घ्या

मुंबई: सध्या देशभरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. भीषण उन्हाने साऱ्यांचीच काहिली केली आहे. त्यातच एसीमध्ये…

3 hours ago

Mumbai Rains:घाटकोपर दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू, मृतांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

मुंबई: मुंबईत सोमवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत आलेल्या धुळीच्या वादळाने तसेच अवकाळी पावसाने…

5 hours ago

IPL 2024: राजस्थानला मोठा झटका, जोस बटलर नाही खेळणार पुढील सामने

मुंबई: राजस्थान रॉयल्सचा(rajasthan  सलामीचा फलंदाज जोस बटलरने संघाला मोठा झटका दिला आहे. आता बातमी येत…

5 hours ago

Mumbai Rain : अवघ्या क्षणाचा पाऊस अन् जीव जाण्याची चाहूल

जाणून घ्या कुठं-कुठं काय घडले? मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातले…

5 hours ago

Jioने आणला नवा प्लान, मिळणार डेटा, कॉलिंग आणि १५हून अधिक OTT

मुंबई: जिओने एक नवा प्लान सादर केला आहे. हा Ultimate streaming plans आहे. हा पोस्टपेड…

6 hours ago