Prasad Lad : मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!

Share

प्रसाद लाड यांचा जरांगेना इशारा

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) संतप्त आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीकास्त्र उपसले आहे. मनोज जरांगे हे पातळी सोडून भाषा वापरत असल्यामुळे मराठा समाजातील काही लोकांनीही नाराजी दर्शवली आहे. त्यातच भाजप नेते व देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही मनोज जरांगे यांना लक्ष्य केले. ‘मनोज जरांगे बडबड बंद करा अन्यथा मराठा समाजच जागा दाखवून देईल!’, असा इशारा त्यांनी जरांगेंना दिला आहे.

मनोज जरांगे पाटील गेले काही दिवस सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट भाषेत टीका करत आहेत. रविवारीदेखील जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी आपल्याविरोधात डाव रचल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, ‘मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत’, अशी टीका त्यांनी केली.

पुढे प्रसाद लाड म्हणाले, ‘यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती. आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल’, असे लाड यांनी म्हटले.

Recent Posts

NEET Exam : नीट परीक्षा रद्द होणार? निकालाविरोधात याचिकेवर आज सुनावणी

विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण नवी दिल्ली : काही दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या रिंगणात पडला…

10 mins ago

Pushpa 2 movie : पुष्पाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! १५ ऑगस्टला रिलीज होणार नाही ‘पुष्पा २’

निर्मात्यांनी नेमका काय निर्णय घेतला? मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल…

34 mins ago

Parenting Tips: मुलांना बाहेरचे कधीपासून खायला द्यावे? जाणून घ्या ही गोष्ट

मुंबई: जसजशी मुले मोठी होतात तसतसे त्यांना पोषणतत्वांची गरज असते. मुलांच्या सुरवातीची दोन वर्षे त्या…

1 hour ago

Jersy: कोण बनवते भारतीय क्रिकेट संघाची जर्सी, किती असते त्याची किंमत

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांची जगभरात काही कमी नाहीये. सामन्यादरम्यान अनेकदा भारतीय चाहते टीम इंडियाची…

2 hours ago

T20 Hundred:२७ बॉलमध्ये शतक, मोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड

मुंबई: टी-२० क्रिकेटम(t-20 cricket) अनेक क्रिकेटर आपल्या तुफानी अंदाजात शतक झळकवत असतात. आतापर्यंत प्रोफेशनल टी-२०…

4 hours ago

PM Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा, शेतकरी संमेलन, गंगा आरती आणि बरंच काही…

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित आहे. ते मंगळवारी संध्याकाळी साडेचार…

5 hours ago