Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमनोज वाजपेयीसाठी सिर्फ एक बंदा पाहाच...

मनोज वाजपेयीसाठी सिर्फ एक बंदा पाहाच…

  • ऐकलंत का!: दीपक परब

गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातील काही सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत, तर काही ओटीटीवर. अभिनेता मनोज वाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी हैं’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. ज्याला आपण देव मानतो तोच पाप करतो तेव्हा काय होते हे या सिनेमात दाखविण्यात आले आहे. ही कथा अशा एका बाबाची आहे ज्याला लोक देव मानतात. पण त्याने आपल्या भक्तावर मात्र अन्याय केला आहे. हा आपल्या अल्पवयीन मुलाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाबद्दल आहे. हा कोर्टरूम ड्रामा प्रत्येकाने पाहायलाच हवा.

‘सिर्फ एक बंदा काफी हैं’ या सिनेमाच्या सुरुवातीला पीसी सोलंकी यांची कथा असल्याचे सांगण्यात आले होते. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना तुरुंगात पाठवणारा सोळंकी हा वकील आहे. या सिनेमात थेट कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. पण वकील पीसी सोळंकी यांच्या नावावरुनच सिनेमाच्या कथेचा अंदाज येतो. या सिनेमाच्या सुरुवातीलाच एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे पालक दिल्लीतील कमल नगर पोलीस ठाण्यात जाताना दिसतात. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर ते एका बाबावर अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा गुन्हा दाखल करतात. गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलीस त्या बाबाला अटक करतात. दरम्यान, बाबांचे भक्त संतापतात. वकील पैसे घेऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. मुलीचे आई-वडील पीसी सोलंकी यांची मदत घेतात. त्यामुळे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहायलाच हवा. अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या सिनेमात एक महत्त्वाचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे दिग्दर्शकांचे विशेष कौतुक.

अभिनेता मनोज वाजपेयीने या सिनेमात चाबूक काम केले आहे. राजस्थानच्या भाषेवर त्याने प्रभुत्व मिळवले आहे. या सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत सिनेमात दिसून येते. एकंदरीत मनोजने पीसी सोलंकीची गोष्ट खऱ्या अर्थाने जिवंत केली आहे. अल्पवयीन मुलीची भूमिका अदिती सिंह एंड्रिजाने साकारली आहे. तिचेदेखील काम चांगले झाले आहे. विपीन शर्माचा अभिनय जबरदस्त आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी या आपली पात्र योग्यपद्धतीने साकारली आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतो. हा एक कोर्ट ड्रामा आहे. जर तुम्ही सत्याच्या पाठीशी असाल, तर तुमचे काहीही नुकसान होऊ शकत नाही, ही या सिनेमाची गोष्ट आहे. या सिनेमाला एक गती आहे. या सिनेमातील संवाद, दृश्ये अत्यंत प्रभावी आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -