अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Share

सिन्नर: सिन्नर जवळ पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये बिबट्या ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेतले. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सातत्याने बिबट्यांचा वावर सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वीच सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या कासारवाडी येथे बिबट्या दिसला होता. त्यानंतर याबाबतची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. वनविभागाने या दृष्टिकोनातून पुढील पावले देखील उचलली होती. बिबट्याचा शोध सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिक – पुणे महामार्गावरील बायपास रस्त्यावर मनेगाव शिवारात भोजने फार्मजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणारा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वनविभागाचे कर्मचारी तातडीने या बिबट्याचे शव ताब्यात घेतले असून पंचनाम्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

Recent Posts

Hindu temples : मुंबईतील प्राचीन मंदिर बाबुलनाथ

कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…

4 hours ago

प्रेमकहाणी भाग-१

नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…

4 hours ago

Drought : डोळे उघड माणसा…

विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…

5 hours ago

Mahabharat : महाभारत युद्धातील जेवण व्यवस्थेचे रहस्य

विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…

5 hours ago

साठवण…

विशेष : नीता कुलकर्णी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आईची... आमच्या परीक्षा झाल्या की, आई वर्षभराच्या…

5 hours ago

Nostalgic song : हसता हुवा नुरानी चेहरा…

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…

5 hours ago