त्या घटनेनंतर माझ्या मनात आत्महत्येचे….

Share

मराठी बिग बॉस या कलर्स मराठी वाहिनीवरील शो मधून घराघरात पोहोचलेल्या किरण माने यांना अखेर तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. या रिअ‍ॅलिटी शोचे हे चौथे पर्व होते.

या आधी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत किरण माने यांची मुलीच्या वडिलांची भुमिका साकारली होती. या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. या मालिकेतील एक्झिटवरुन सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला होता. त्यावेळी त्यांच्या सह कलाकारांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मात्र समाजमाध्यमावर सक्रीय असलेल्या किरण मानेंना तिथेही संमिश्र पाठिंबा मिळाला होता.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्यांनी ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नैराश्याबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, मुलही झाली हो मालिकेतूनबाहेर काढल्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे माझे मानसिक संतुलन बिघडले. माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यावर अनेक चुकीचे आरोप केले. मला काम मिळणही बंद झालं होतं. माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते. जीवन संपवून टाकावंस वाटत होतं.
मात्र त्यानंतर किरण माने बिग बॉस मराठी या शो मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले. उत्तम डावपेच खेळत लोकांची मने जिंकत असतानाच त्यांना बिग बॉस मराठीमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
त्यानंतर भावुक होत किरण माने यांनी पोस्ट लिहिली.

किरण माने पोस्टमध्ये काय बोलले?

बिग बॉसमध्ये मी मनापासून खेळण्यात गुंग होतो, तेव्हा मला कणभरही कल्पना नव्हती की बाहेर माझ्या पाठीशी इतका जबराट सपोर्ट उभा रहातोय ! बाहेर आल्यापासून रोज माझे चाहते याची जाणीव करून देतात. परवा सातारकर भगिनींच्या वतीनं मंगळवार पेठेत माझा भव्य सत्कार आयोजित केला गेला. आमदार श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. अक्षरश: भारावून गेलो. जवळपास ३००० महिला यावेळी उपस्थित होत्या. सगळ्या माझ्या बहिणी मला भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी आतूर झाल्या होत्या. नगरसेविका लिनावहिनी गोरे आणि राजूदादा गोरेंनी हा योग घडवून आणला. बाबाराजे जेव्हा म्हणाले की, “किरण माने आता फक्त सातार्‍याचे राहिले नाहीत, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके झाले आहेत.” तेव्हा सगळ्यांनी जो जल्लोष केला, तो अजूनही कानात घुमतोय !
कसे आभार मानू? काय बोलू? काही सुचत नाही. सगळ्या महाराष्ट्रातून आमंत्रणं येताहेत. लोक भेटायला उत्सुक आहेत.

लै लै लै भारी वाटतंय.
सगळ्यांचे मनापासून आभार.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

8 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

9 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

10 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

10 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

10 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

10 hours ago