केशव स्मृती प्रतिष्ठान जळगाव

Share

शिबानी जोशी

एकमेकांशी संवाद साधून आपल्या प्रश्नांची उकल करावी यासाठी प्रयत्न केले जातात. आजपर्यंत अनेक आजीआजोबांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यात तिथल्या कार्यकर्त्यांना यश आले आहे. क्षुधा शांती सेवा संस्था ही सात्विक आणि घरासारखं जेवण अल्पदरात पुरवणारी संस्था असून ना नफा ना तोटा तत्त्वावर सर्व स्तरातील लोकांची क्षुधा शांत करण्याचा हा प्रकल्प आहे.यामुळे गरीब,गरजू ३५ महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. या महिला कर्मचाऱ्यांची देशातल्या विविध धार्मिक स्थळांची दरवर्षी सहल काढली जाते आणि त्यांनाही विरंगुळा देण्याची अभिनव कल्पना राबवली जाते. जळगाव शहरात सैन्यभरती,पोलीस भरतीसाठी अनेक उमेदवार येतात. लग्नाची खरेदी,लग्न,औषधोपचार यासाठी आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या नागरिकांना जळगाव एसटी स्टँडच्या समोर हे केंद्र उपलब्ध असून अतिशय कमी दरात दर्जेदार अन्न पुरवठा केला जातो. इथलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठल्याही मशीनचा वापर केला जात नाही .अगदी पोळ्या सुद्धा महिला हाताने तयार करतात. फ्रीज इथे मुद्दाम नाही त्यामुळे शिळे अन्न दिलं जात नाही .रोजच्या रोज नवीन अन्न बनत.जवळजवळ दोन हजार लोक दररोज इथे आपली क्षुधा शमवतात.

महिला बचत गटांच्या जाळंही संस्थेमार्फत विणण्यात आल आहे .महिलांचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट ठेवून आज तीन हजार सहाशे बचत गटतून ६५ हजार महिलांचा प्रत्यक्ष सहभाग या गटात आहे. बचत गटाद्वारे निर्मित वस्तूंसाठी प्रदर्शन आणि विक्री तसेच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम संस्थेतर्फे केलं जात. “आश्रय माझे घर” हा प्रकल्प मतिमंदांना आजन्म आधार म्हणून ओळखला जातो. या मतिमंद करता स्वावलंबी होण्यासाठी राखी, पणती, अगरबत्ती, फ्लॉवरपॉट ,पेपर बॅग सारख्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण त्यांच्या बुद्ध्यांक नुसार त्यांना दिलं जात.

“ज्ञान हे असं एकच दान आहे जे दिल्याने वाढतं त्यामुळे अनेक शैक्षणिक प्रकल्प संस्थेने उभे केले आहेत. खानदेशातील अग्रगण्य शाळा म्हणून संस्थेच्या शाळा प्रसिद्ध आहेत. डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालय आणि विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी विषयातील अभ्यासक्रम शिकवला जातो .काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये सीबीएससी उपक्रम शिकवला जातो .शानबाग माध्यमिक विद्यालय सावखेडा, निवासी शाळा सावखेडा अशा शैक्षणिक संस्थांच्या 14 विभागांमार्फत सहा हजार 356 विद्यार्थी तसंच 321 शिक्षक आणि 120 शिक्षकेतर कर्मचारी इथे शैक्षणिक कार्यात गुंतलेले आहेत.” मूकं करोति वाचालम् पंगु लंगयथे गिरिम” हे ब्रीदवाक्य असलेला श्रवण विकास मंदिर हे देखील संस्थेचे वैशिष्ट्य आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करून इथे शिक्षण दिलं जात. व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं . कर्ण यंत्रांच सवलतीच्या दरात वितरण केलं जात. या शाळेला राज्यस्तरीय उत्कृष्ट विद्यालयाचा संचलन म्हणून पुरस्कार देखील मिळाला आहे. वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी “विद्यार्थी विकास केंद्र” चालवलं जातं.नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता हे केंद्र कार्यरत आहे. कौशल्य विकास प्रबोधिनी या संस्थेमार्फत रोजगारक्षम आधुनिक कौशल्य विकसित करण्याचं प्रशिक्षण दिलं जा.

संस्थेचा आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे” समतोल प्रकल्प” रेल्वे स्टेशन आणि परिसरात अडचणीत असलेल्या भरकटलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोचवणं, त्यांच समुपदेशन करण. बाल भिकारी, भंगार वेचणारे ,नशा करणारे, व्यसनाधीन अशा भरकटलेल्या मुलांसाठी हा उपक्रम राबवला जातो. रेल्वे स्टेशन वर सापडलेल्यांना त्यांच्या घरच्यांशी सुखरूप भेट घडविण्यात येते .कायदेशीर अडचणीत असलेल्या मुलांना बालसुधारगृहात देखील दाखल करण्यात येत. संस्थेचे हे काम पाहून रेल्वे प्रशासनाने भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर संस्थेला स्वतंत्र बाल कक्ष स्थापन करण्यासाठी छोटी जागाही दिली आहे. नुकतीच जळगाव रेल्वे स्थानकात सुद्धा त्यांना अशा प्रकारची जागा मिळाली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयच्या सहकार्याने 1098 हेल्प लाईन देखील संस्थेतर्फे चालवली जाते.

अनेक वैद्यकीय प्रकल्प संस्था राबवते. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी ही खानदेशात टेस्टेड रक्तपुरवठा करणारी प्रथम रक्तपेढी आहे .गरीब, गरजू रुग्णांना सवलतीत किंवा मोफत रक्त पुरवठा केला जातो. रक्तपेढी प्रमाणेच मांगीलालजी बाफना नेत्रपेढी चालवली जाते. ही खान्देशातील एकमेव पेढी असून इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. दर वर्षी सुमारे 13 हजार रुग्णांची माफक दरात तपासणे येथे केली जाते. आत्तापर्यंत 237 जणांना नेत्ररोपणतून दृष्टिदान करण्याचं मोठं काम या पेढीन केलं आहे.आर्थिक मदतीसाठी प्रकल्पही संस्थेअंतर्गत चालतात .जळगाव जनता सहकारी बँक, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था ,जे जे आय टी फिंटेकच्या माध्यमातून कर्जपुरवठा तसंच आर्थिक मदत केली जाते.

आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी “सेवा वस्ती विभाग” सुरू करण्यात आला असून “चलो जलाये दिया वहा, जहा कभी भी अंधेरा है” या वाक्याला अनुसरून महिला वाचनालय, एकता भजनी मंडळ ,हरतालिका पूजन ,नववर्ष स्वागत यात्रा, व्यवसाय प्रशिक्षण, संस्कार वर्ग ,ज्येष्ठ नागरिक संघ, किशोरी विकास प्रकल्प इथून राबवले जातात. संस्थेतर्फे “अविनाशी सेवा पुरस्कार” दरवर्षी प्रदान केला जातो.

अशा रीतीने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचं काम अधिक गतीने होईल हा विश्वास बाळगून सामाजिक, शैक्षणिक ,वैद्यकीय ,आर्थिक क्षेत्रात या प्रकल्पांच्या माध्यमातून केशव स्मृती प्रतिष्ठान कार्यरत आहे. संघ कार्यकर्त्यांनी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी केलेलं चौफेर कार्य पाहायचं असेल तर जळगावच्या केशव स्मृती प्रतिष्ठानला एकदा भेट द्यायलाच हवी.
joshishibani@yahoo.com

Recent Posts

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा….

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर) हर्ष हा साकारला मनी आनंदाच्या या क्षणी नवागतांचे करी स्वागत सर्व…

8 hours ago

Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का…

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच…

9 hours ago

Hardik pandya: हार्दिक पांड्याचा मुलासोबत क्यूट Video, नाही दिसली पत्नी

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे आणि ते सुपर…

9 hours ago

Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या…

11 hours ago

Kalyan News : रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांचा खड्ड्यात बसून ठिय्या

योगिधाम परिसरात मुख्य रस्त्यात खड्डा खणल्याने नागरिक संतप्त कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात नुकताच…

13 hours ago

Sikkim Rain : सिक्कीममध्ये पावसाच्या थैमानात महाराष्ट्रातील २८ जण अडकले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; अडकलेल्यांशी संपर्क साधत दिला धीर डेहराडून : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी…

13 hours ago