Nashik Loksabha : दिंडोरीमध्ये मविआला धक्का; माकप निवडणूक लढवण्यावर ठाम!

Share

आधी घेतली होती मदतीची भूमिका मात्र आता उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

नाशिक : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) सुरु असताना मविआला (MVA) धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. मविआमध्ये सांगलीच्या जागेवरुन वाद निर्माण झाले, त्यातूनच विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. त्यानंतर आता दिंडोरीमध्ये देखील काहीशी अशीच परिस्थिती उद्भवली आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माकपचे माजी आमदार जे पी गावित (J. P. Gavit) यांनी केली होती. मात्र ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) वाट्याला आली. शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीत पहिल्या दिवसापासून माकपने मित्रपक्षाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, गेल्या आठवड्यात शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर जे पी गावित यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढविण्याची घोषणा केली. तेथेच महाआघाडीच्या फुटीची पहिली ठिणगी पडली. जे पी गावित यांनी दिंडोरीत जाहीर सभा घेत महाविकास आघाडीने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार, असा इशारा शरद पवारांना (Sharad Pawar) दिला होता.

माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्यांची काल ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत दिंडोरीतून माजी आमदार गावित यांना निवडणुकीच्या रिंगण्यात उतरविण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला. पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जयंत पाटलांकडून मनधरणीचा प्रयत्न

दिंडोरीत डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट दिंडोरी गाठत गावितांशी चर्चा देखील केली. त्यावेळी विधानसभेच्या मदतीचा प्रस्ताव पाटील यांनी गावितांसमोर ठेवला. पण, आमचा पक्ष एकदा घेतलेला निर्णय पुन्हा मागे घेत नाही, असे सांगत गावितांनी पवार गटाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे आता दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडी, माकप व वंचित अशी चौरंगी लढत रंगणार आहे.

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

25 mins ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

59 mins ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

4 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

5 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

5 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

6 hours ago