आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जानेवारीपर्यंत बंदच

Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय उड्डाणे २१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी २३ मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली आहे.

देशातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे सरकारने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्यामुळे आणि भविष्यातील संभव्य धोका लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणे अनिर्वाय असणार आहे.

दरम्यान, डीजीसीएने आदेशात स्पष्ट केले आहे की हे निर्बंध सर्व मालवाहू उड्डाणे आणि विशेष मान्यताप्राप्त उड्डाणांसाठी नाहीत. कोविड-19 चा धोका लक्षात घेता २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. प्राधिकरणाने म्हटले आहे की, विशिष्ट मार्गांसाठी अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे केसच्या आधारावर मंजूर केली जाऊ शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सोबतच, सर्व विमानतळ चालकांना पाठवलेल्या या आदेशाचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.

कोरोना महामारीमुळे २३ मार्च २०२० पासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. नंतर, गेल्या वर्षी जुलैपासून, सुमारे २८ देशांसह बायो बबल व्यवस्था अंतर्गत उड्डाणे मंजूर करण्यात आली. सध्या भारताची ३२ देशांसोबत बायो बबल व्यवस्था आहे.

Recent Posts

मनसे नेते अविनाश जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल…

मनसे नेते अविनाश जाधव यांनी झवेरी बाजारातील सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला धमकावत पाच कोटी रुपयांची खंडणी…

2 mins ago

सरकारने हटवली कांदावरील निर्यात बंदी, बळीराजा सुखावला…

Onion Export: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात 'निषिद्ध' वरून 'मोफत' मध्ये सुधारणा…

44 mins ago

Prakash Ambedkar : काँग्रेसचा न्यायाशी संबंध नाही!

काँग्रेस आणि तिची जातीय वर्चस्ववादी वृत्ती खाली आणा आधी आघाडीची बोलणी झालेल्या काँग्रेसविषयी प्रकाश आंबेडकर…

2 hours ago

Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

8 hours ago