मॉस्कोत कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ८० जण ठार, अनेकजण जखमी

Share

मॉस्को : मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये सुरू असलेल्या मैफिलीत तीन अज्ञात बंदुखधारी व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर या हॉलच्या इमारतीलाही आग लागल्याचे वृत्त आहे.

रशियाच्या राज्य आरआयए न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तात सांगितले की, २२ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत अगोदर गोळीबार झाला आणि त्यानंतर इमारतीच्या आत आग लागली. या हल्ल्यात दोन ते पाच जणांचा सहभाग होता, अशी प्राथमिक माहिती इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

रशियन सोशल मीडिया चॅनेलवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मैफिलीतील उपस्थित लोक मोठ्या संख्येने हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. त्याच वेळी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु असून बंदूकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू येत होता.

इतर व्हिडिओ फुटेजमध्ये सभागृहाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेले लोक दिसत होते. TASS राज्य वृत्तसंस्थेने ज्या इमारतीत गोळीबार झाला तेथे स्फोट आणि आग लागल्याचे वृत्त दिले आहे.

कॉमरसंट वृत्तपत्राने बाहेर चित्रित केलेले फुटेज पोस्ट केले आहे. यात मैफिली झालेल्या इमारतीमधून धुराचे मोठे ढग दिसत असल्याचे म्हटले आहे.

Recent Posts

Vidhan Parishad Elections : विधानपरिषद निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या!

का घेण्यात आला हा निर्णय? मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल ४ जूनला…

9 mins ago

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी सज्ज; वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज

गंगा पूजन आणि कालभैरवाचा घेतला आशीर्वाद वाराणसीसोबत गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध शेअर करत झाले भावूक…

27 mins ago

Jackie Shroff : ‘भिडू’ शब्दावरुन जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव!

नेमकं प्रकरण काय? नवी दिल्ली : अभिनेते किंवा अभिनेत्री आपल्या एखाद्या डायलॉगने किंवा स्टाईलने प्रसिद्ध…

52 mins ago

Pune Crime : धक्कादायक! काळी जादू नष्ट करण्याच्या नावाखाली ज्योतिषाने महिलेकडून उकळले १५ लाख

गुंगीचे औषध... अंतर्वस्त्रातील फोटो... नराधमाने कसा घातला गंडा? पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

1 hour ago

Manoj Jarange Patil : लोकसभेच्या निकालाच्या दिवशीच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार!

'या' कारणासाठी करणार उपोषण जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे…

2 hours ago

Gold and silver Rate : खूशखबर! ग्राहकांची लगबग; सोनं-चांदीच्या दरात झाली घसरण

जाणून घ्या आजचे दर काय? मुंबई : सध्या देशभरात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशावेळी सोन्याच्या…

3 hours ago