Indices : ‘‘निर्देशांकाच्या तेजीला लागला ब्रेक’’

Share
  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराच्या तेजीला या आठवड्यात लगाम लागला. सलग काही महिने झालेल्या तेजीनंतर या आठवड्यात निर्देशांकानी तेजीला ब्रेक लागल्याचे संकेत दिले. निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टी आणि बँक निफ्टी यांनी मध्यम मुदतीच्या चार्टनुसार नकारात्मक बंद देत एकदम मोठी तेजी येणार नाही, याचे संकेत दिलेले आहेत. मागील आठवड्यात झालेली तेजी ही अत्यंत मर्यादित होती. मी मागील लेखात सांगितल्याप्रमाणे यापूर्वीच निर्देशांकात मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे पुढील काही काळात मोठे करेक्शन येणे अपेक्षित आहे हे सांगितलेले आहे.

सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती मंदीची आहे. त्यामुळे अल्पमुदतीच्या चार्टनुसार टेक्निकल ॲनालिसिसनुसार मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल, मात्र नवीन खरेदीसाठी मात्र निर्देशांक “नो बाय झोन” मध्ये आलेले आहेत. त्यामुळे नवीन शेअर्समध्ये खरेदी करण्यासाठी वाट पाहणेच योग्य ठरेल. अल्पमुदतीसाठी कमिन्स इंडिया, महानगर गॅस, ॲबोट इंडिया बजाज ऑटो यासह अनेक शेअर्सची दिशा मंदीची आहे. आपण आपल्या १७ जुलै २०२३ च्या लेखात मध्यम मुदतीचा विचार करता “झोमॅटो” या शेअरने ८० ही अत्यंत महत्वाची पातळी तोडत टेक्निकल ॲनालिसिसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ८२.५० रुपये किंमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होवू शकेल. पुढील काळात हा शेअर १०० ते ११० रुपये किंमतीपर्यंत वाढ दाखवणे अपेक्षित आहे, हे सांगितलेले होते.

या आठवड्यात “झोमॅटो” या शेअरने ९८.४० हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पहावायचे झाल्यास १९ टक्क्यांची वाढ “झोमॅटो” मध्ये केवळ २ आठवड्यात झालेली आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून सोने ५८,८०० या पातळीच्यावर आहे तोपर्यंत सोन्याची दिशा तेजीची राहील. पुढील आठवड्यासाठी निफ्टीची १९,८०० ही महत्वाची पातळी असून जोपर्यंत ही पातळी तुटत नाही, तोपर्यंत अल्पमुदतीत निफ्टीमध्ये आणखी घसरण होऊ शकते. आता ज्यावेळी निफ्टी १९,८०० पातळी तोडून त्या पातळीच्या वर स्थिरावेल त्याचवेळी निर्देशांकात पुन्हा तेजी पाहावयास मिळेल.

आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणेच या आठवड्यासाठीदेखील ‘वेट अँड वॉच’ हीच मानसिकता ठेवून शेअर बाजारात गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या करेक्शनमध्ये कोणते शेअर्स घ्यायचे, याचा विचार करून त्यानुसार आखणी करणे आवश्यक आहे. आपण मागील लेखात सांगितल्याप्रमाणे निर्देशांकात पुढील काळात जर करेक्शन आले तर फंडामेंटल बाबतीत उत्तम असलेल्या कंपन्यांचा विचार करता येईल.

आपण आजपर्यंत या सात वर्षांच्या लेखमालेत दीर्घमुदतीसाठी उत्तम म्हणून सांगितलेल्या सनफार्मा, झायदस, वेलनेस, गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट, मॅरिको लिमिटेड, कॅम्स, एचडीएफसी बँक, एचडीएफसी एएमसी यांचा विचार करता येईल.“फ्युचर आणि ऑप्शन”मध्ये व्यवहार करत असलेल्यांनी योग्य पातळ्या बघून त्यानुसार मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. मात्र व्यवहार करताना “फ्युचर आणि ऑप्शन” प्रकारात असलेली जोखीम लक्षात घेऊन आपापली जोखीम घेण्याची क्षमता ओळखूनच व्यवहार करणे अपेक्षित आहे.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही).

(samrajyainvestments@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

मुंबई, ठाणे, कल्याणसह नाशिकमध्ये उद्या मतदान

प्रचाराचा थंडावल्या तोफा, आता मतदारांच्या कौलाची प्रतिक्षा मुंबई : देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार…

23 mins ago

परमछाया…

माेरपीस: पूजा काळे अश्मयुगीन किंवा त्याहीपेक्षा अतिप्राचीन काळापासून मनुष्य जन्माचं कोडं अघटित, अचंबित करणारं आहे.…

1 hour ago

कर्करोगाला हरवून ४०० कोटी रुपयांची कंपनी सुरू करणारी कनिका

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे वयाच्या २३ व्या वर्षी तिला कर्करोग झाला. मात्र तिने हिंमतीने…

2 hours ago

CSK vs RCB: प्लेऑफमध्ये बंगळुरु ‘रॉयल’ एंट्री, चेन्नईचा २७ धावांनी केला पराभव…

CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने…

2 hours ago

मराठीचा हक्क

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार…

2 hours ago

मुंबईवर वर्चस्व कोणाचे?

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या…

2 hours ago