IND vs AUS: भारताची मालिकेत विजयी आघाडी, चौथ्या सामन्यात भारताचा विजय

Share

रायपूर: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात रंगलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवत ही मालिका खिशात घातली आहे.

भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला मालिकेत पराभव करत घेतला. भारताने चौथ्या सामन्यात ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १५४ धावा करता आल्या.

भारताकडून रिंकू सिंहने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर जितेश शर्माने त्याला चांगली साथ देत ३५ धावांची खेळी केली. भारताची सुरूवात चांगली झाली. भारताच्या सलामीवीरांनी जयश्वी जायसवालने ३७ धावा तर ऋतुराज गायकवाडने ३२ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर भारताचे काही विकेट झटपट पडले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्यात केवळ एक धाव करता आली.

१७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघाची सुरूवात डळमळीत झाली. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून ट्रेविस हेडने ३१ धावा केल्या तर मॅथ्यू वेडने नाबाद ३६ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.

Recent Posts

Air Travel : प्रवाशांसाठी आनंदवार्ता! हवाई प्रवास आता आणखी स्वस्त होणार

मुंबई : जून महिना सुरु होताच अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. अशातच हवाई प्रवाशांसाठीही…

43 mins ago

Gas Cylinder : ग्राहकांना दिलासा! सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात घट

मुंबई : सध्या सोनं चांदीचे दर (Gold Silver Price Hike) गगनाला भिडत असताना अशातच ग्राहकांना…

3 hours ago

Weather Update : मान्सून लांबणीवर? हवामान विभागाकडून ‘या’ भागात उष्णतेचा यलो अलर्ट

मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच…

4 hours ago

Mumbai Megablock : मेगाब्लॉकचा फटका बसलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ‘या’ तारखेला होणार!

मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) सीएसएमटी (CSMT) आणि ठाणे (Thane) स्थानकातील फलाटाची रुंदी वाढवण्याच्या…

5 hours ago

Pune News : शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅगेमुळे उडाली खळबळ!

पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल पुणे : पुण्यात कार अपघात, गोळीबार, हल्ला अशा घटना…

5 hours ago