साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम नंतर आता प्रांताधिकारी ईडीच्या ताब्यात

Share

ईडीच्या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले

दापोली : मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्यानंतर आता ईडीने दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ताब्यात घेतले आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

यापूर्वी जयराम देशपांडे हे दापोलीतील प्रांताधिकारी होते. त्यांच्याच कारकिर्दीत साई रिसॉर्ट प्रकरणात मंजुरी मिळाली होती. देशपांडे यांच्यावर साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देशपांडे यांचे शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. व त्यांची चौकशी सुरु होती. मात्र आता साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे.

चारच दिवसांपूर्वी माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे धाकटे बंधू आहेत. मात्र ते ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.

Recent Posts

पाऊस आला… दरडी कोसळल्या, पर्यटकांनो सावधान!

पावसाळा सुरू झाला की, दरडी कोसळणे, डोंगरांचा भाग ढासळणे, नदी-नाले, ओढे यांना पूर येणे, पुलावरून…

3 hours ago

बुडत्याचा पाय खोलात…

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे देशामध्ये निवडणुकांची धामधूम सुरू असताना पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा चर्चेत आला. पाकिस्तानी…

3 hours ago

छोट्या उद्योग व्यवसायासाठी अनुमानित कर आकारणी

उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत व्यवसाय सुरू करण्याचे अनेक पर्याय आहेत. त्यासाठी कंपनीची स्थापना केलीच…

4 hours ago

BAN vs NED: शाकिबच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने नेदरलँड्सला हरवले, सुपर८मधील आव्हान कायम

मुंबई: शाकिब अल हसनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्सला २५ धावांनी हरवले. बांगलादेशने नेदरलँड्सला…

5 hours ago

Friday: शुक्रवारच्या दिवशी करू नका ही कामे, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

मुंबई: शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा दिवस असतो. लक्ष्मी मातेची कृपा मिळवायची असेल तर काही…

5 hours ago

तुमच्या शरीरात युरिक अ‍ॅसिड तर वाढत नाहीये ना? दुर्लक्ष करू नका…

मुंबई: चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलमुळे शरीरात युरिक अ‍ॅसिडचा स्तर वाढू लागतो. खाण्या-पिण्याच्या गोष्टीमधून अनेकदा…

7 hours ago