कलाकारांचे मानधन दुप्पट, तर गरिबांच्या पगारात कपात का?

Share

मुंबई : कोरोना काळात अनेक बड्या कलाकारांचे मानधन दुप्पट करण्यात आले, मात्र याच क्षेत्रात काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचे म्हणजेच लाईटमॅनसारख्या अनेक गरिबांच्या वेतनात कपात करण्यात आली. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या या भेदभावाच्या वागणुकीवर अभिनेता रोनीत रॉयने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता रोनीत रॉय म्हणाला, ‘मी केलेल्या पडताळणीत मला असे समजले की, अनेक ए-लिस्टर्स कलाकारांचे पगार (मनधन) दुप्पट करण्यात आले आहे. मात्र, गरिबांचे पैसे कापण्यात आले. आमच्या क्षेत्रात ज्याप्रकारे भेदभाव घडत आहे तो खूप चुकीचा आहे.’ तसेच गरीब कुटुंबातील व्यक्तीचा पगार कापणे हे लाजिरवाणे असल्याचे रोनीत म्हणाला.

‘एका लाईटमॅनला त्याचे संपूर्ण घर चालवायचे असते. त्यामुळे त्याचा पगार कापून तुम्हाला काय मिळणार? पगार कमी करायचाच असेल तर बड्या कलाकारांचा करा…गरिबांसोबत असे का वागता? हे वागणे योग्य नाही,’ असे रोनीत रॉय म्हणाला.

रोनीत रॉयची स्वत:ची सेक्युरीटी एजन्सी आहे. रोनीत सर्व बॉलिवूड कलाकारांना सुरक्षा आणि बॉडीगार्ड पुरवतो. कोरोना काळात अनेक कलाकारांनी बॉडीगार्डची गरज नसल्याचे सांगून त्यांना कामावरून कमी केले होते. त्यामुळे रोनीतने १२५ कर्मचाऱ्यांना स्वत: पगार दिला. दीड वर्षाचा काळ खूप कठिण असून या काळात खूप शिकायला मिळाले, असे रोनीत म्हणाला.

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

5 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

7 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

7 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

7 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

8 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

9 hours ago