मला पुरुषाची गरज नाही; अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशी केले लग्न!

Share

मुंबई : ‘सोलोगॅमी’ म्हणजेच स्वतःशी लग्न करणे ही संकल्पना जगभर वेगाने फोफावत आहे. अलीकडेच ‘दिया और बाती हम’ फेम कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न केले आहे, ज्यानंतर सोलोगॅमी पुन्हा चर्चेत आले आहे. यापूर्वी गुजरातच्या क्षमा बिंदूने स्वतःशी लग्न केले होते. कनिष्काने १६ ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

कनिष्काने तिच्या सोशल मीडिया हँडलवर भांगात कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेला एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, ‘मी स्वतःशी लग्न केले आहे. कारण मी माझी स्वप्ने स्वतः पूर्ण करते. मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती मी स्वतः आहे. मला कधीही पुरुषाची गरज भासली नाही.’

“मी नेहमीच एकटी आनंदी असते आणि माझ्या गिटारसोबत शांततापूर्ण जीवन जगतेय. मी एक देवी आहे, बलवान आणि सामर्थ्यवान आहे, शिव आणि पार्वती दोघेही माझ्यात आहेत.” कनिष्काने तिच्या वाढदिवशी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

तिला हॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. मीडियाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत कनिष्काने सांगितले होते की, तिला आता तिच्या अभिनयाला अधिक उंचीवर नेण्याची इच्छा आहे, त्यामुळे तिला हॉलिवूडवर लक्ष केंद्रित करायचे आहे. इतकंच नाही तर कॅनडाच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या शॉर्ट फिल्ममध्येही भूमिका मिळाल्याचे तिने सांगितले होते. यामुळे तिने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.

टीव्ही अभिनेत्री कनिष्का अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे. तिने २००७ मध्ये ‘बाथरूम सिंगर’ या सिंगिंग रिअॅलिटी शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘दिया और बाती हम’, ‘दो दिल एक जान’, ‘बाल वीर’, ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’, ‘बेगुसराय’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यासह अनेक गाजलेल्या टीव्ही मालिकांमध्ये ती झळकली. काही काळापूर्वी कनिष्काने टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला होता, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Recent Posts

Vinod Tawde : ‘आयेगा तो मोदीही’ ही भावना मतदार आणि विरोधकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी!

पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…

13 mins ago

Deep fake videos : निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…

1 hour ago

Summer Fruits: ही फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका

मुंबई: आपण सर्व आठवडाभर फळे आणि भाज्या रेफ्रिजेटरमध्ये स्टोर करतात. मात्र काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने…

1 hour ago

Amit Shah : इंडिया आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब!

राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार? रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र रत्नागिरी…

2 hours ago

वाशीतील केबीपी कॉलेजला नॅक कडून ए प्लस प्लस ग्रेड

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व…

2 hours ago

Eknath Shinde : विरोधकांकडे मशाल नसून आईस्क्रीमचा कोन आहे जो उन्हात वितळणार!

ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना जोरदार टोला नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर…

3 hours ago