संसदेत कसे बोलायचे? खासदारांना पडला प्रश्न?

Share

गद्दार, दलाल, लॉलीपॉप, शकुनी, विश्वासघात, भ्रष्ट, माफिया, नौटंकीसह अनेक शब्द संसदेत बॅन!

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या आधी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या असंसदीय शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरणे असंसदीय मानले जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने ‘असंसदीय शब्द २०२१’ या शीर्षकासह ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

गद्दार, शकुनी, जयचंद, भ्रष्ट, यासह अनेक शब्द वापरण्यावर आता संसदेत निर्बंध असणार आहेत. मात्र लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. जुमला, कोरोना स्प्रेडर, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड आणि अक्षम असे शब्द देखील बॅन केले आहेत.

जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, भ्रष्ट, बाल बुद्धी, स्नूपगेट, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू, कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, खलिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, संवेदनहीन, सेक्सुअल हरेसमेंट हे हिंदी शब्द हटवण्यात आले आहेत.

लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तसेच पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून काही शब्दांना आणि वाक्यांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. यात ‘आपण माझा वेळ वाया घालवत आहात’, ‘तुम्ही आमचा गळा दाबून टाका’, ‘खुर्चीला कमजोर केलं आहे’, ‘ही खुर्ची सदस्यांचं संरक्षण करु शकत नाही’ अशा वाक्यांचा समावेश आहे.

काही इंग्रजी शब्दांवर देखील निर्बंध आणण्यात आले आहेत. यात आय विल कर्स यू, बिटेन विद शू, बिट्रेड, ब्लडशेड, चिटेड, शेडिंग क्रोकोडाइल टियर्स, डंकी, गून्स, माफिया, रबिश, स्नेक चार्मर, टाउट, ट्रेटर, विच डाक्टर, डिसग्रेस, ड्रामा, आईवॉश, मिसलीड, लाय, अनट्रू असे शब्द समावेशित आहेत.

नियम ३८१ नुसार काढले जातात असंसदीय शब्द

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जर अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला तर तो शब्द हटवण्यासाठी ते आदेश देतात. तर नियम ३८१ नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो.

Tags: BetrayedBetten With ShoeBloodshedCheatedDisgracedramaDunkieEyewashGoonsHow to speak in Parliament?I Will Curse YouLieMafiaMisleadMPs have a question?RabishShading Crocodile TearsSnake CharmerTouttraitorUnparliamentary wordsUntrueWitch Doctorअक्षमअपमानअराजकतावादीअसत्यअसंसदीय शब्दअहंकारकमीनाकाला दिनकाला बाजारीकाला सत्रकोयला चोरकोरोना स्प्रेडरखरीद फरोख्तखलिस्तानीखासदारांना पडला प्रश्न?खून की खेतीगद्दारगिरगिटगुल खिलाएगूंसगोरू चोरघड़ियाली आंसूचरस पीते हैंचांडाल चौकडीचिलम लेनाछोकराजयचंदड्रामाढिंढोरा पीटनातानाशाहतानाशाहीदंगादलालदादागीरीदुर्व्यवहारदोहरा चरित्रनिकम्मानौटंकीपाखंडपिट्ठूबहरी सरकारबाल बुद्धीबेचाराभ्रष्टमाफियालॉलीपॉपविनाश पुरुषविश्वासघातशकुनीशर्मसंवेदनहीनसंसदेत कसे बोलायचे?सांडस्नूपगेट

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

6 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

10 hours ago