Self Esteem : तुमच्या मुलांची सेल्फ एस्टीम कशी आहे?

Share
  • आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू

ज्या मुलांची सेल्फ एस्टीम लो असते, ते संकोची, अंतर्मुख असतात. याउलट ज्यांची ‘सेल्फ एस्टीम’ उच्च दर्जाची असते ती मुलं उत्साही, कृतिशील असतात. मुलं मोठी होत असताना त्यांना पाठिंबा दिल्याने आणि त्यांची सेल्फ एस्टीम विकसित करण्याकरिता मदत केल्याने त्यांचं मानसिक आरोग्य सुधारतं, ज्यामुळे त्यांना आयुष्यात खूप फायदा होतो.

‘सेल्फ एस्टीम’ ही अभ्यासात यश मिळवणं, उपक्रमात सहभाग घेणं, कार्यक्रमात एन्गेज राहणं, सामाजिक नातेसंबंध आणि अर्थातच त्यांचं कल्याण या सगळ्यात फार कुशल भूमिका पार पाडते. ज्या मुलांची सेल्फ एस्टीम लो असते, ते संकोची, अंतर्मुख असतात. स्वतःबाबत स्वतःच काही मर्यादा आखून घेतात. मग त्यांची तशीच मानसिकता तयार होते. याउलट ज्यांची ‘सेल्फ एस्टीम’ उच्च दर्जाची असते ती मुलं उत्साही, कृतिशील असतात, आपली किंमत, मूल्य काय आहे याची त्यांना उत्तम जाण असते आणि आपण जे कोणी आहोत, जसे आहोत त्याबद्दल ते समाधानी असतात.

मुलं मोठी होत असताना त्यांना पाठिंबा दिल्याने आणि त्यांची सेल्फ एस्टीम विकसित करण्याकरिता मदत केल्याने त्यांचं मानसिक आरोग्य सुधारतं, ज्यामुळे त्यांना आयुष्यात खूप फायदा होतो. आता पाहू या मुलांच्या वाढीत आणि विकासात सेल्फ एस्टीमची भूमिका…

स्वतःचं मूल्य, आपली किंमत, आपण स्वतःकडे कसं पाहतो याबद्दलची आपली जाण मोजण्याचं ‘सेल्फ एस्टीम’ हे एक साधन आहे. आपली सेल्फ एस्टीम जर उच्च दर्जाची असेल, तर आपण स्वतःला मौल्यवान समजतो. स्वतःवरचा विश्वास वाढतो. परफाॅर्म करण्याची क्षमता, शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम दर्जाचे होते. व्यक्ती म्हणून आपली चांगली वाढ होते. आयुष्यात आपल्यावर येणारे अपयशाचे, सेटबॅकचे प्रसंग अशा मुलांना चांगल्या पद्धतीने, आत्मविश्वासाने हाताळता येतात आणि लो सेल्फ एस्टीम असली की आपण कोण आहोत? हे जाणून घ्यायलासुद्धा मुलांना आवडत नाही.

  • सेल्फ एस्टीमचं मुलांच्या जीवनातील महत्त्व काय असतं तर…

मुलांच्या आनंदात, आपण कोण आहोत या मूल्यांची जाण आणि त्यांची ओव्हर ऑल डेव्हलपमेंट अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. उच्च दर्जाची सेल्फ एस्टीम असणारी मुलं अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम असतात. आपल्या व्यक्तिमत्त्व आणि आपल्यातील गुणवैशिष्ट्यांबद्दल, आपल्या अचिव्हमेंट्सबद्दल त्यांना अभिमान वाटतो.मदत मागण्यात, स्वतःसाठी काही करण्यात ते संकोच करत नाहीत.

  • उच्च दर्जाची सेल्फ एस्टीम असली की मुलांची वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रगती होते.

१) (Resilience) चुका आणि अपयशातून दुरुस्त होण्याची क्षमता त्यांच्यात असते.
२) आंतरिक प्रेरणा म्हणजेच स्वतःला काही करणं आवश्यक आहे याची महत्त्वपूर्ण जाणीव त्यांना असते.
३) स्वावलंबी होऊन काम करण्याचं महत्त्व त्यांना जाणवते.
४) स्वतःविषयी आदराची भावना असते.
५) नाती जोडण्यात सुरक्षित वाटतं.
६) पीअर प्रेशर असतानाही समतोल विचार करून निर्णय घेता येतो.
७) व्यवसायात ही मुलं खूप छान यशस्वी होतात. सामाजिक रिलेशनशिप चांगल्या प्रकारे सांभाळतात. जुळवून घेण्याच्या क्षमता उच्च दर्जाच्या असतात. पाॅझिटिव्ह पर्सेप्शन असतं. निरोगी मन शरीर राखण्याची उत्तम जाण असते.
n मुलांची सेल्फ एस्टीम नीचतम दर्जाची असेल, तर नक्कीच त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना पाॅझिटिव्ह फीडबॅक, योग्य पाठिंबा मिळालेला नसतो हे लक्षात ठेवायला हवं.
१) अशा मुलांना निराशा, राग, दुःख, चिंता या भावनांनी ग्रासलेले असते.
२) या मुलांचा शिकण्यातील रस संपून गेलेला असतो.
३) मित्र बनवण्यात, टिकवण्यात या मुलांना अडचणी येतात.
४) यांच्यावर पीअर प्रेशरमुळे खूप ताण येतो, त्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत. ते या पीअर प्रेशरमधून बाहेर पडू शकत नाहीत.
५) स्वतःचा पराभव झाला, तर त्या निराशेतून, दुःखातून बाहेर पडण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ नसतं. ते अशा गोष्टींपासून दूर पळतात, टाकतात.
६) या मुलांचं वागणं असामाजिक (antisocial) होऊ शकतं. लोकांना इजा करणं, catastrophic, आत्महत्या या गोष्टी घडवणारं असतं.

  • सेल्फ एस्टीम ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असते. मुलांचा व्यक्तिमत्त्व प्रकार, आनुवंशिक लक्षणं, घरातील वातावरण यांचा परिणाम तसंच बरेच बाकीचे अन्य घटकही मुलांच्या स्वप्रतिष्ठेवर प्रभाव टाकतात.
  • सेल्फ एस्टीम लो असण्याची पाच कारणे :
    १) मुलांच्या कामाचं, प्रयत्नांचं, यशाचं, सफलतेचं योग्य कौतुक केलं न जाणं किंवा अतिकौतुकही घातकच ठरतं. कारण त्यातून नार्सिस्टिक टेन्डन्सी वाढते. कौतुक करायचं पण मुलांचं नाही, तर त्यांच्या प्रयत्नांचं.
    २) पीअर ग्रुपकडून बळी –
    मुलं जर बुलिंग, आक्रमकता, बंडखोर वर्तन याचे पीअर ग्रुपकडून बळी ठरले असतील, तर त्याचे अतिशय घातक परिणाम दिसून येतात. मुलांची सेल्फ एस्टीम खूप कमी होते. हे परिणाम बऱ्याच कालावधीपर्यंत टिकून राहू शकतात आणि ज्यांची स्वप्रतिष्ठा मुळातच कमी असते, ती खूप जास्त प्रभावहीन होते.
    ३) हाय बॉडी मास इंडेक्स (BMI)
    ४) अभ्यासाचा ताण –
    निराशा, काळजी आणि अभ्यासाचा ताण यामुळे मुलांच्या सेल्फ एस्टीमचा दर्जा खालावू शकतो.
    ५) नकारात्मक फीडबॅक –
    पालकांच्या किंवा केअर टेकर्सच्या नकारात्मक शेरेबाजीने, कमेंट्सने मुलांवर फार वाईट परिणाम होतो. जसं की मूर्ख, यूजलेस, आळशी असं म्हटल्याने मुलांच्या स्वप्रतिष्ठेला धक्का लागतो. मुलांकडे, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याने, बोलण्यात समजल्याने, तसं वाढवल्याने, विनाकारण तुलना केल्याने मुलांचं मानसिक आरोग्य नक्कीच धोक्यात येतं. मुलांचं जेंडर, शाळेतील परफाॅरर्मन्स, पालकांच्या शिक्षणाचा दर्जा, नोकरी, सोशल इकॉनॉमिक स्टेटस हे घटकही इनडायरेक्टली प्रभाव टाकतात.
  • मग मुलांची स्व-प्रतिष्ठा (self esteem) विकसित कशी करायची तर…
    १) मुलांच्या आत्मविश्वासात तसेच आव्हानांचा मुकाबला करून पुन्हा नव्याने उसळून वर येण्याची क्षमता मिळवण्यात ‘स्वप्रतिष्ठा’ हा फार महत्त्वाचा घटक आहे. सहभाग, अडचणीतून वर येणं, मदत मागणं, योग्य सपोर्ट मिळणं या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे मुलांची सेल्फ एस्टीम आणि सेल्फ काॅन्फिडन्स वाढतो.
    २) मुलांनी काय मिळवलं यापेक्षा त्यांनी काय प्रयत्न केले, याची प्रशंसा करा.
    ३) जे मित्र तुमच्या मुलांना ते जसे आहेत, तसे ॲक्सेप्ट करतात. अशा आपल्या मित्रांचा छोटेखानी ग्रुप तयार करायला प्रोत्साहन द्या. ज्यातून मी कुणाचा तरी आहे, ही बिलाँगिंगची भावना मुलांची सेल्फ एस्टीमची भावना वाढवू शकेल.
    ४) मुलांमध्ये स्वतःत, तसेच त्यांच्या भोवताली असणाऱ्या मित्र मंडळींत लक्षात येण्याजोगा आणि सकारात्मक फरक ओळखू यावा, याकरिता त्यांनी आपले गुण जाणून त्यांचा वापर करायला शिकवल्याने मुलांची स्वप्रतिष्ठा वाढीस लागेल.
    ५) नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्याला मुलांना उत्तेजन द्या.
    ६) प्रॉब्लेम्स आले, तर शांत राहून, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून, वेळप्रसंगी मदत मागून, जेव्हा मनासारखं घडत नाही, तेव्हा मदत करणाऱ्यांशी दयाळूपणे वागणे यातून मुलांची सेल्फ एस्टीम वाढत असते.
Tags: Self Esteem

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

12 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

13 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

13 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

14 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

14 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

14 hours ago