Share

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२३

अनुकूलता जाणवेल
मेष – आजूबाजूच्या परिस्थितीतून आपल्याला अनुकूलता जाणवेल. लहान-मोठी रोजची कामे सहज होत असल्याकारणाने आपल्याला आश्चर्य वाटेल. मात्र जास्त जोखीम भरलेली कामे पूर्ण करताना खबरदारी अवश्य घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे नुकसानकारक होऊ शकते. नोकरीमध्ये मुत्सद्दीपणाने वागण्याची गरज आहे. राजकारणापासून तसेच गटबाजीपासून दूर राहणे हिताचे ठरेल. तुमच्या बोलल्यामुळे अनेक अडचणी दूर होतील. आपल्या मताला प्राधान्य मिळून इतरांवर प्रभाव टाकाल. कौटुंबिक स्थिती चांगली राहील.
शुभ घटना घडतील
वृषभ –गेल्या काही दिवसांमध्ये ज्या तब्येतीच्या कुरबुरी होत्या त्या संपुष्टात येतील. त्यामुळे उत्साहात वाढ होईल तसेच अनेक चांगल्या आणि शुभ घटना घडून येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचा प्रवास करावा लागेल. पर्यटन आणि देवदर्शनाच्या निमित्ताने हे प्रवास होतील. नोकरीमध्ये परिस्थिती चांगली राहील. प्रगती झालेली दिसेल. काहींना पदोन्नती, तर काहींची बदलीदेखील होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल होईल. अधिकार वाढतील. मुलांच्या प्रगतीपर वार्ता कानी आल्यामुळे समाधानी राहा. अचानक धनलाभ होऊ शकतो.
शुभ घटना घडतील
मिथुन – हा आठवडा तसा अनुकूल स्वरूपाचा जाणार आहे. घेतलेल्या परिश्रमांचे चीज होईल. नोकरदारांना दिलासा मिळू शकतो. पदोन्नती व वेतन वृद्धीची शक्यता. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग जवळचे किंवा दूरचे प्रवास करण्याचे नियोजन करू शकाल; परंतु वादविवादाचे प्रसंग टाळा. कुटुंबात मुला-मुलींकडून मनाला समाधान देणाऱ्या वार्ता मिळतील. त्यांच्याविषयीच्या समस्या संपुष्टात आल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी व समाधान अनुभवाल. व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढल्याने समाधानी राहाल. व्यावसायिक भागीदाराबरोबर उत्तम संबंध राहतील.
अचानक धनलाभ
कर्क – निरनिराळ्या मार्गांनी अचानक धनलाभ होऊ शकतो. जमिनीची तसेच मालमत्तेची कामे मार्गी लागून आर्थिक आवक होईल. कार्यमग्न राहाल, मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. जीवनसाथीचे सहकार्य सर्व बाबतीत मिळेल. नातेवाइकांच्या संपर्कात याल. मात्र वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. घरात आनंदी वातावरण कसे राहील, याच्या प्रयत्नात असाल. मनात एक अनामिक भीती घर करून राहू शकते. नोकरी-व्यवसायात सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल, मात्र सरकारी कामात विलंब लागू शकतो. प्रवासाचे बेत आखले जातील.

धनलाभ होतील
सिंह – होती ती पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. काही कामे पूर्ण करण्यात यश मिळेल तसेच या सप्ताहात धनप्राप्तीचे प्रभावी योग आहेत. अनेक मार्गांनी धनलाभ होतील. व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यवसायात नवीन संकल्पना राबवू शकाल. जमिनीच्या व्यवहारांमध्ये लाभ होतील. वारसाहक्काची कामे होतील. भावंड आणि नातेवाईक यांच्यातील गैरसमज दूर होतील. चांगले संबंध प्रस्थापित होतील. मित्रमंडळी भेटतील.
शैक्षणिक प्रगती होईल
कन्या – बहुतेक क्षेत्रातील नियोजन यशस्वी झाल्याकारणाने ताणतणाव मुक्त वातावरणाचा लाभ मिळेल. मनासारख्या घटना घडतील. जी महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची आपण वाट बघत होतात ती होऊ शकतात. महत्त्वाचे निरोप येतील. कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होण्यामधील अडचणी दूर होतील. कुटुंबातील मुला-मुलींचे प्रश्न संपुष्टात येतील. शैक्षणिक प्रगती होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. अवघड कामे पूर्ण होतील. त्यामुळे डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखे वाटेल.
सहकार्य लाभेल
तूळ – मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदी आणि प्रसन्न राहाल. धनप्राप्तीचे योग आहेत. काही अडकलेले पैसे मिळतील. व्यवसाय-धंद्यात भरभराट होईल. नोकरीत आपल्या कामामुळे वरिष्ठ प्रभावित होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. काहींना दूरचे प्रवास करावे लागतील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जीवन साथीचे सहकार्य लाभेल. तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश मिळू शकते. अनुकूल प्रतिसाद मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कार्यामध्ये अनपेक्षित अडचणी निर्माण होण्याची शक्यता.
धार्मिक स्थळी भेट द्याल
वृश्चिक – सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. स्वतः खर्च कराल तसेच सहकुटुंब सहपरिवार एखाद्या पवित्र धार्मिक स्थळी भेट द्याल. दान धर्माकडे कल राहील. पूजापाठ करण्यात मन रमेल. लोकांना मदत कराल. मालमत्तेच्या अथवा जमिनीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद मिटतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशाचा ओघ राहील. नोकरीत सहकारी तसेच वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आवडत्या कलेसाठी, छंदासाठी वेळ, पैसा खर्च करू शकाल.
जीवनसाथीची साथ मिळेल
धनु – कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. एखादे धार्मिक किंवा मंगलकार्याचे आयोजन होऊ शकते. गृहसौख्य चांगले राहील. घरातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. जीवनसाथी साथ मिळेल. तसेच मदतही मिळेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढेल. मात्र संबंधितांशी मधुर संभाषण करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहून ताणतणाव संपुष्टात येऊ शकतो. वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. सहकुटुंब प्रवासाचे बेत निश्चित कराल. काही वेळेस महत्त्वाच्या कामांत समस्या वाढण्याची शक्यता.
जमिनीच्या कामात यश
मकर – पूर्वी केलेल्या नियोजनाद्वारे कामे पूर्ण होत असलेली बघून आत्मविश्वासात वाढ होईल. विविध प्रकारच्या कामांना गती मिळून कामे पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. स्थावर मालमत्ता अथवा जमिनीच्या कामात यश लाभेल. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. कामांमधील शिस्त पाळण्याची आवश्यकता तसेच आपले कामांमधील ज्ञान अद्यावत ठेवण्याची आवश्यकता आहे. हाताखालील मंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. मुला-मुलींच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणे क्रमप्राप्त ठरेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.
आनंदित राहाल
कुंभ – सामाजिक तसेच धार्मिक आतापर्यंत जे जातक नोकरीच्या शोधात होते अशा जातकांचा नोकरीविषयक प्रश्न अथवा समस्या सुटून नोकरी मिळेल. रोजगार उपलब्ध होईल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी ठरून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते तसेच कॉलेज कॅम्पसमधून नोकरीसाठी निवड होऊ शकते. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायची संधी मिळाल्यामुळे आनंदित राहाल. चालू नोकरीमध्ये कामाचे स्वरूप बदलू शकते. जबाबदाऱ्या वाढतील. सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपवला जाऊ शकतो.
प्रवासात सावधानता बाळगा
मीन – सहकुटुंब सहपरिवार अथवा मित्रमंडळींसह लहान तसेच दूरच्या अंतराचे प्रवास करू शकाल. मात्र प्रवासात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रवासात खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक आहे. देवदर्शन घडेल. सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. नातेवाईक आप्तेष्टांच्या भेटीगाठी होऊन त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हाल. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल अथवा व्यवसाय विस्तार करता येईल. नोकरीत परिस्थिती सर्वसामान्य राहील. अपेक्षित कामे होतील. आर्थिक चिंता कमी होईल.

Recent Posts

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

15 mins ago

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

4 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

7 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

8 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

8 hours ago