Wednesday, April 24, 2024
Homeताज्या घडामोडी'ऑस्कर २०२३'मध्ये भारताचा इतिहास!

‘ऑस्कर २०२३’मध्ये भारताचा इतिहास!

‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार!

‘The Elephant Whisperers’ या माहिटीपटाला सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

नवी दिल्ली : ‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. ‘ऑस्कर २०२३’मध्ये (Oscars २०२३) भारताने इतिहास रचला आहे. तब्बल २१ वर्षानंतर ९५व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ (The Elephant Whisperers) या माहिटीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. तर दुसरीकडे राजामौलींच्या बहुचर्चित ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्याने बेस्ट ओरिजनल सॉन्ग या श्रेणीमध्ये ऑस्कर पटकावला आहे. त्यामुळे यंदा ‘ऑस्कर २०२३’ भारतासाठी खूपच खास ठरला आहे.

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू-नाटू हे तेलगू गाणे आहे. तथापि त्याचे हिंदीत भाषांतर नाचो नाचो असे करण्यात आले. हे गाणे तामिळमध्ये नट्टू-कूथू, कन्नडमध्ये हाली नाट्टू आणि मल्याळममध्ये करिंथॉल या शीर्षकासह रिलीज करण्यात आले.

२००८ मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी एआर रहमान यांना शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला होता. १५ वर्षांनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे.

‘जय हो’ या गाण्याला ऑस्कर मिळाला होता, परंतू ती ब्रिटिश फिल्म होती. अशा परिस्थितीत भारतीय चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. जे हिंदी चित्रपटातील गाणे आहे. हे गाणे जूनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. ज्यांचे हुक स्टेप कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी ११० चालींमध्ये तयार केले होते. या गाण्याला आधीच ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब जिंकणारे हे पहिले भारतीय आणि आशियाई गाणे आहे.

हे गाणे बनवण्याची कथा खूप रंजक आहे. ऑस्कर मिळालेले संगीतकार एमएम कीरवानी एकेकाळी अकाली मृत्यूच्या भीतीने संन्यासी म्हणून जगले होते. तर दुसरीकडे ज्या गाण्यावर जगभरातील लोक नाचत आहेत, त्या गाण्याच्या स्टेप्स बनवणारे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

१९ महिन्यांत लिहिली २० गाणी, मग झाली ‘नाटू-नाटू’ची निवड

चित्रपटातील नाटू-नाटू हे गाणे मैत्रीवर आधारित आहे. हे गाणे बनवण्यासाठी १९ महिने लागले. संगीतकार एमएम कीरवाणी यांनी या चित्रपटासाठी २० गाणी लिहिली होती, परंतु त्या २० गाण्यांपैकी नाटू-नाटूला अंतिम स्वरूप देण्यात आले. चित्रपट निर्मितीशी संबंधित लोकांच्या ओपिनियनच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. ९० टक्के गाणे फक्त अर्ध्या दिवसात पूर्ण झाले. उर्वरित पूर्ण करण्यासाठी १९ महिने लागले.

कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांनी गाण्यासाठी स्टेप्स तयार केल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांना दोन मित्र एकत्र पार पाडू शकतील अशा स्टेप्स हव्या होत्या, पण स्टेप्स इतक्या क्लिष्ट नसाव्यात की इतर त्यांची कॉपी करू शकत नाहीत. गाण्याचे हुक स्टेप करण्यासाठी कोरिओग्राफरने ११० चाली तयार केल्या.

हे गाणे तयार झाल्यानंतर, ते ऑगस्ट २०२१ मध्ये युक्रेनमधील कीव येथील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या मारिन्स्की पॅलेसमध्ये शूट करण्यात आले. संपूर्ण गाणे कीवमध्ये १५ दिवसांत शूट करण्यात आले, ज्यामध्ये ५० बॅकग्राउंड डान्सर्स आणि सुमारे ४०० ज्युनिअर कलाकारांचा समावेश होता.

नाटू नाटू हे गाणे १० नोव्हेंबर २०२१ रोजी रिलीज झाले. त्याची तामिळ आवृत्ती रिलीज झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत यूट्यूबवर १७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले. त्याचवेळी, सर्व ५ भाषांमध्ये त्याचे एकूण व्यूव्हर्स ३५ दशलक्ष होते. १ दशलक्ष लाईक्स ओलांडणारे ते पहिले तेलुगू गाणे होते. सध्या फक्त हिंदी आवृत्तीला यूट्यूबवर २६५ दशलक्ष व्ह्यूज आणि २.५ दशलक्ष लाईक्स आहेत.

आत्महत्या करणार होते कोरिओग्राफर

नाटू-नाटू गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांचे वडील एकेकाळी हिरे व्यापारी होते. १९९३ मध्ये कौटुंबिक मतभेदांमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कुटुंब इतके गरीब झाले होते की, वडील चित्रपटांमध्ये नृत्य सहाय्यक बनले. आणि प्रेम एका शिंप्याच्या दुकानात काम करू लागला. एके दिवशी गरिबीला कंटाळून प्रेम आत्महत्या करण्यासाठी चेन्नईच्या मरीना बीचवर गेला. आत्महत्या केल्यावर डान्स फेडरेशनचे लोक कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करतील, असा विचार त्यांनी केला. आत्महत्येपूर्वी प्रेमला समजले की, समुद्रकिनारी पोहोचण्यासाठी त्याने वापरलेली सायकल ही उसनी घेतली होती. तो असाच मेला तर सायकलमुळे कुटुंबाला त्रास होईल. असा विचार करून तो सायकल ठेवण्यासाठी घरी आला. घरी येताच त्यांना वडिलांचा फोन आला की प्रेमला एका चित्रपटात डान्स कलाकार म्हणून काम मिळाले आहे. प्रेम यांनी नोकरी मिळताच आत्महत्येचा विचार सोडून दिला.

विद्यार्थी चित्रपटासाठी प्रथम प्रेम यांनी नृत्यदिग्दर्शन केले. ते गाणे पाहून राजामौली इतके खूश झाले की, त्यांनी कोरिओग्राफरला कळवले. गाण्याचे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित असल्याची माहिती होताच राजामौली यांनी स्वत: त्यांना बोलावून घेतले. विचारले की, तुम्ही मुलांना नृत्य शिकवू शकता का? यानंतर राजामौली यांनी त्यांना छत्रपती चित्रपटात कोरिओग्राफर म्हणून काम दिले. ज्युनियर एनटीआर या चित्रपटातूनच स्टार झाला. त्याचबरोबर या चित्रपटातून प्रेम रक्षितलाही ओळख मिळाली.

नाटू- नाटू गाण्याचे संगीतकार एम.एम. कीरवाणी यांना यापूर्वीच RRR मधील नाटू नाटू गाण्यासाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार मिळाला आहे. ‘तू मिले दिल खिले’, ‘तुम आये तो आया मुझे याद गली में आज चाँद निकला’ आणि ‘जादू है नशा है’ हे कीरवाणी यांनी रचलेले सदाबहार सूर आहेत. जे प्रेक्षकांच्या कानाला गेल्या कित्येक वर्षांपासून गोडवा देत आहेत. कीरवानी यांच्या आयुष्यातील संगीताचा प्रवास वयाच्या चौथ्या वर्षांपासून सुरू झाला. व्हायोलिन सुरू झाला. मध्यंतरी एक काळ असाही आला, जेव्हा त्यांनी आपले प्रसिद्ध झालेले नाव बदलून एमएम करीम केले. या नावाने त्यांनी संगीत देखील दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -