शुक्रवारी ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार हिंदी ‘पुष्पा ‘

Share

हैदराबाद : अभिनेता अल्लू अर्जुनच्या धमाकेदार पुष्पा : दि राईज चित्रपटाचा हिंदी भाग 14 जानेवारीला, (शुक्रवारी) ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.’पुष्पा ‘ चित्रपटास हिंदीत जोरदार प्रतिसाद लाभला. अल्लू अर्जुनने प्रस्थापित हिंदी चित्रपटांना मागे टाकत अखिल भारतीय स्तरावर ख्याती आणि प्रसिद्धी प्राप्त केली.

अनेक क्षेत्रातील मान्यवर देखील ‘पुष्पा ‘चे सामाजिक माध्यमांवर कौतुक करीत आहेत. विविध भाषांमधील आघाडीच्या अभिनेत्यांनी, मान्यवरांनी पुष्पा आणि अल्लू अर्जुनचे जाहीर कौतुक केले आहे.

हिंदी ‘पुष्पा’साठी श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनच्या व्यक्तिमत्वास साजेसा आवाज दिला आहे. अल्लू अर्जुनचे हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणात चाहते आणि प्रशंसक आहेत. अनेक वर्षांपासून टीव्ही, विविध हिंदी चित्रपट वाहिन्यांवर त्यांच्या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी भागांद्वारे ते संपूर्ण देशात आधीच प्रसिद्ध होते.

बाहुबलीद्वारे प्रभास, आरआरआरद्वारे रामचरण आणि ज्युनियर एनटीआर प्रमाणेच अल्लू अर्जुन टॉप ५ अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. बाहुबली दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्याप्रमाणेच दिग्दर्शक सुकुमार देखील पुष्पामुळे प्रकाशझोतात आले आहेत. एस एस राजमौली यांच्या सल्ल्यानुसारच पुष्पा हिंदीत प्रस्तुत करण्यात आला.

मागील आठवड्यात पुष्पा तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. ऍमेझॉन प्राईमवरही चित्रपटास आणि अल्लू अर्जुन यांच्या अभिनयास उत्तम प्रतिसाद लाभतो आहे.

पुष्पा : दि राईज नंतर पुष्पा : दि रुल जास्तीत-जास्त भारतीय भाषांमध्ये प्रस्तुत करण्याचा निर्णय अल्लू अर्जुन यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. दुसऱ्या भागाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे.

पुष्पा : दि राईज आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या सीमावर्ती भागात विशेषतः तिरुपती येथील अरण्यात चंदन तस्करी या विषयावर पुष्पराज या मजुराची आणि त्याने निर्माण केलेल्या साम्राज्याची एक काल्पनिक कथा आहे.

Recent Posts

Mobile: तुमच्या या चुकांमुळे मोबाईलची बॅटरी पटापट संपते

मुंबई: हल्ली मोबाईल फोन(mobile phone) सगळ्यांची गरज बनली आहे. फोन नेहमी व्यवस्थित चालू राहावा यासाठी…

19 mins ago

Lok Sabha Election 2024: तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाल आज सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात केली आहे. देशभरातील…

2 hours ago

Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र…

2 hours ago

रायगड लोकसभेत सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक लोकसभेची मात्र, विधानसभेच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला पेण(देवा पेरवी): रायगड लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार दि. ०७ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण चतुर्दशी ११.४१ पर्यंत नंतर अमावस्या शके १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी.…

5 hours ago

आज मुंबईत पाणीकपात !

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…

7 hours ago