सरकारची आता ‘कॉकटेल लस’

Share

मुंबई : पंतप्रधान मोदींनी 10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासूनच बुस्टर डोसबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बुस्टर डोस किती दिला जाणार? कोणत्या लसीचा दिला जाणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. पण लस देताना सरकार एक खास प्लान राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचे पहिले दोन डोस एका वॅक्सिनचे देण्यात आले असतील तर तिसरा म्हणजेच, बुस्टर डोस त्याच वॅक्सिनचा देण्यात येणार नाही. तो दुसऱ्या वॅक्सिनचा देण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस, अर्थात कोरोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोसचं वितरण सुरु होणार आहे. मात्र तुम्ही ज्या लशीचे दोन डोस घेतले आहेत. तीच लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता कमी आहे. कारण बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी केली जात आहे. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं एका अभ्यासानंतर समोर आलं आहे. या संदर्भातील अहवाल अजून प्रसिद्ध व्हायचा आहे.

मीडिया वृत्तानुसार “जर एखाद्या व्यक्तीला त्यानं आधी घेतलेल्याच लसीचा बुस्टर डोस दिला तर तो तेवढा परिणामकारक ठरत नाही. पण कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे” जर सरकारनं डोस मिक्सिंगला परवानगी दिली, तर सीरम इन्स्टिट्यूटचे कोवोव्हॅक्स (नोव्हावॅक्सचा भारतीय ब्रँडचं नाव) हे पूर्वी कोविशील्ड मिळालेल्या लोकांसाठी बूस्टर डोससाठी वापरलं जाऊ शकतं.

Recent Posts

Salman Khan Firing case : सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या अनुज थापनची आत्महत्या नव्हे तर हत्या?

कुटुंबियांच्या दाव्याने उडाली खळबळ मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल…

22 mins ago

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…

7 hours ago

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…

9 hours ago

मराठी पाट्या लावण्यासाठी सक्ती का करावी लागते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…

9 hours ago

कामगारांना सुरक्षित वातावरण हवे

आशय अभ्यंकर, प्रख्यात अभ्यासक देश जागतिक पातळीवर विकासाच्या नवनवीन पायऱ्या पार करत असताना कामगारांची उत्तम…

10 hours ago

‘मॉरिशस रूट’ टाळण्यासाठी…

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार भारतातून मॉरिशसला निधी पाठवायचा, तेथे कंपनी स्थापन करायची आणि मग तो पैसा…

10 hours ago