Gold Rate : ग्राहकांना सुखद धक्का! सोनं-चांदीच्या दरात घसरण; ग्राहकांना दिलासा

Share

जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर

मुंबई : सध्या अनेक ठिकाणी लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच सोने व चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला होता. मात्र आता सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. गगनाला भिडत असणाऱ्या सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण होत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे. जाणून घ्या सध्याच्या सोन्या-चांदीच्या किंमती काय आहेत.

गेल्या दोन महिन्यांच्या विक्रमी दरवाढीनंतर मागील तीन दिवसांत सोन्या आणि चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट दिसून आली आहे. सततच्या वाढीमुळे सोन्याची किंमत ७५,००० रुपयांवर झेप घेईल असे दिसत होते. पण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळपासून सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर ७०,९८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत आहेत. तर दिवसभरात या दरांमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, चांदीचा दर ८०,८२६ रुपये प्रति किलोवर घसरला आहे. मात्र सप्टेंबरपर्यंत चांदीचे दर वाढून ८३,८३९ रुपये प्रति किलोवर येण्याची शक्यता वर्तवली आहे.

सराफा बाजारातील सोन्याचा दर

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ७२,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्याच्या दरात १४५० रुपयांनी घट झाली आहे. पुढील काही दिवस सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. सोनं ७०,००० रुपयांवर येण्याची शक्यता आहे.

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ६६३०० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ७१६०० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ६५५८० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची किंमत

भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर स्वस्त होत असताना जागतिक बाजारात दोन्ही धातूच्या किंमती वधारल्या आहेत. बुधवारी सोन्याच्या जागतिक किंमतीतही घसरण दिसून आली. कॉमेक्सवर सोन्याचे जागतिक फ्युचर्स ०.१८% किंवा ४.१० डॉलरने घसरून २,३३८ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते, तर सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस २,३२५.१९ डॉलरवर तेजीसह ट्रेंड करत आहेत. त्याचवेळी, बुधवारी चांदीच्या जागतिक किमतीत वाढ नोंदवली गेली आणि कॉमेक्सवर चांदीचे फ्युचर्स ०.२६% किंवा ०.०७ डॉलर वाढीसह २७.७१ डॉलर प्रति औंसवर तर चांदीची जागतिक स्पॉट किंमत २७.४० डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

Tags: GOLD RATE

Recent Posts

Pune Porsche Accident : डॉ. तावरे सगळ्यांची म्हणजे कोणाकोणाची नावे घेणार?

पुणे : कल्याणीनगर अपघातामधील (Pune Porsche Accident case) अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्त नमुने बदलल्याप्रकरणी अटक…

4 mins ago

Ajit Pawar : अजित पवार असला तरी कारवाई करा!

पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांचा खुलासा पुणे : ''हो, मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन…

21 mins ago

Dhadak 2 : एक होता राजा…एक होती राणी…त्यांची जात वेगळी.. अन्…

करण जोहरकडून 'धडक २'ची घोषणा; आता चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री 'या' तारखेला होणार चित्रपट रिलीज…

49 mins ago

pre wedding : बॉलिवू़डचे व-हाड निघालंय इटलीला!

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी आलिया-रणबीर ते सलमान-धोनीपर्यंत अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार एकच चर्चा! प्री-वेडिंगला कोणकोण बॉलिवूड…

2 hours ago

SSC Result 2024 : लातूरचा पॅटर्नच वेगळा! दहावी परीक्षेत १२३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण

लातूर : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result) घेण्यात आलेल्या दहावी…

2 hours ago

Gold Silver Rate : ग्राहकांना महागाईचा फटका! सोनं-चांदीच्या दरात पुन्हा लक्षणीय वाढ

जाणून घ्या आजचे दर  नवी दिल्ली : सोनं चांदी खरेदीदारांसाठी एक मोठी माहिती समोर आली…

4 hours ago