Tuesday, June 18, 2024
HomeदेशGiorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे केले असे स्वागत

Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे केले असे स्वागत

नवी दिल्ली: जी७ शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इटलीमध्ये पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी(Giorgia Meloni) यांनी स्वागत केले. भारत जी७ शिखर परिषदेत आऊटरिच राष्ट्र म्हणून भाग घेत आहे. पंतप्रधान मोदी जी७ आऊटरिच शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी गुरूवारी रात्री उशिरा इटलीच्या आपुलिया येथे पोहोचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने शुक्रवारी जी७ शिखर परिषदेत जागतिक नेत्यांसोबत सार्थक चर्चेसाठी खूप उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी७ शिखर परिषदेत आऊटरिस सत्रात भाग घेण्यासाठी आपुलिया येथे पोहोचल्यानंतर हे विधान केले.

 

पंतप्रधान मोदींनी या नेत्यांची घेतली भेट

जी-७ शिखर परिदषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोडिमिर झेलेस्की यांची भेट घेतली.

इटलीला पोहोचल्यावर काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांना याचा आनंद आहे की सलग तिसऱ्या कार्यकाळात त्यांचा पहिला राजकीय दौरा जी७ शिखर परिषदेसाठी इटलीचा आहे. पंतप्रधान यांनी इटलीच्या आपल्या मागील दौरा तसेच पंतप्रधान मेलोनी यांच्या भारत दौऱ्याच्या आठवणी ताज्या केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -