आता घ्या झटपट घटस्फोट! सहा महिने थांबण्याची गरज नाही

Share

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

नवी दिल्ली : नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसेल, तर त्या दाम्पत्याला लवकर घटस्फोट घेता येईल, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने थांबावे लागत होते. मात्र जर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होत नसेल, तर थांबण्याची काही गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयामध्ये घटस्फोट प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. फॅमिली कोर्टाकडे प्रकरण न पाठवता १४२व्या अनुच्छेदानुसार, सर्वोच्च न्यायालय घटस्फोट देऊ शकते का, असे या याचिकेत विचारण्यात आले होते. त्यावर हा निर्णय देण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. नात्यात कधीही सुधारणा होऊ शकत नसेल तर घटस्फोट देणे कोर्टाला शक्य आहे, असे या खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे दोघांना आता लवकर वेगळे होता येणार आहे.

सध्याच्या कायद्यानुसार, पती-पत्नीला घटस्फोट घ्यायचा असल्यास फॅमिली कोर्टात जावे लागते. या कोर्टाकडून त्यांना विचार करण्यासाठी आणि एकमेकांमधले नाते सुधारण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो. त्यामुळे घटस्फोट लगेच मिळत नाही, त्यासाठी हा वेळ जावा लागतो. यामध्ये अनेकदा काही जोडप्यांचा घटस्फोट घेण्याचा विचार बदलतो.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसेल, तर दाम्पत्याला लवकर घटस्फोट घेता येणार आहे.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दि. ११ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र मार्गशीर्ष १०.१४ नंतर आर्द्रा योग…

6 hours ago

हिंदूंची चिंताजनक घट

देशाच्या स्वातंत्र्यापासून हिंदू-मुस्लीम वाद जगजाहीर आहे. मुळातच देशाला स्वातंत्र्य मिळताना मुस्लिमांसाठी पाकिस्तान व हिंदूंसाठी भारत…

9 hours ago

वेगवान आरामदायी प्रवास दृष्टिक्षेपात

शिवाजी कराळे पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान आयात करणारा भारत आता तंत्रज्ञानाची निर्यात करत वेगळी ओळख निर्माण…

9 hours ago

महापुरुषांची जयंती आणि पदाधिकाऱ्यांची चंगळ

रवींद्र तांबे आपल्या लोकशाहीप्रधान भारत देशात महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात दरवर्षी विविध कार्यक्रमांनी साजऱ्या केल्या…

10 hours ago

CSK vs GT: गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकलं, चेन्नईचं वादळ तब्बल ३५ धावांनी रोखलं…

CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नई…

11 hours ago

Moto G Stylus 5G झाला लाँच, कमी किंमतीत दमदार फीचर्स

मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन Moto G Stylus 5G लाँच केला आहे. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये…

13 hours ago