पुणे विद्यापीठात फिरण्यासाठी मोफत बससेवा पुन्हा सुरू

Share

पुणे (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे.

विद्यापीठात सीएनजी बससेवा सुरू करण्यासंदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनुसार ही बससेवा २०१९ या वर्षात सुरू करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्ससिबिलिटी’ अंतर्गत विद्यापीठाला दोन बस उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला तीन महिने मोफत आणि त्यानंतर नाममात्र शुल्क आकारण्याची योजना होती.

तशी ही बससेवा सुरूही झाली मात्र काही काळातच कोरोना आल्यामुळे ही बससेवा बंद करावी लागली होती. मात्र आता विद्यापीठ परिसर पुन्हा एकदा विद्यार्थी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी फुलला असल्याने कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र – कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एक बस दर अर्ध्या तासाने परिसरात फेऱ्या करत आहे. ही बस विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

6 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

6 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

7 hours ago