Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाFIFA World Cup 2022 : मोरक्कोने क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले!

FIFA World Cup 2022 : मोरक्कोने क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले!

दोहा (वृत्तसंस्था) : गत वेळच्या उपविजेत्या क्रोएशियाला यंदाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या (FIFA World Cup 2022) सलामीच्या लढतीत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मोरोक्कोविरुद्धचा हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने ही लढत अनिर्णित राहिली.

रशियात २०१८ मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला होता. मात्र गतवेळच्या उपविजेत्यांना यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मोरोक्कोविरूद्ध एकही गोल करता आला नाही. त्यांचा कर्णधार ल्युका मॉड्रीचची जादू या सामन्यात काही चालली नाही. ग्रुप एफमधील क्रोएशिया आणि मोरॉक्को सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

गतवेळच्या वर्ल्डकपचा उपविजेता क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात फिफा वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच लढत झाली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी संथ सुरूवात केली. दरम्यान, मोरॉक्कोने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. त्याला नंतर क्रोएशियाने देखील प्रति आक्रमण करत चांगले प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मोरोक्कोने पहिल्या हाफमध्ये क्रोएशियाच्या गोलपोस्टच्या दिशेने पाच शॉट्स खेळले. मात्र त्यातील एकही ऑन टार्गेट नव्हता. क्रोएशियाने देखील मोरोक्कोच्या गोलपोस्टवर चारवेळा हल्ला चढवला.

त्यातील एक अचूक होता मात्र मोरोक्कोचा गोलकिपर बोनोने हा प्रयत्न हाणून पाडला. क्रोएशियाचा स्टार फुटबॉलर ल्युका मॉड्रिचने फर्स्ट हाफ संपत आला असताना एक जोरदार फटका मारला होता. मात्र हा फटका मोरोक्कोच्या गोलपोस्टवरून बाहेर गेला. पासिंग आणि बॉल ताब्यात ठेवण्यात दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला.

दुसऱ्या हाफमध्ये उपविजेत्या क्रोएशियाकडून तुलनेने दुबळ्या मोरोक्कोविरुद्ध चांगला खेळ झाला. मात्र गोलशून्यची कोंडी फोडण्यात त्यांना अपयश आले. मात्र मोरोक्कोच्या आक्रमणावर प्रतिआक्रमण करण्यात ल्युका मॉड्रीचचा क्रोएशिया कमी पडला. दुसऱ्या हाफमध्ये मोरोक्कोने तब्बल ८ वेळा क्रोएशियाच्या गोलपोस्टवर आक्रमण केले. त्यातील फक्त २ शॉट्सच ऑन टार्गेट होते.

दुसरीकडे मोरोक्कोने क्रोएशियाला फक्त ५ वेळा स्वतःच्या गोलपोस्टवर चाल करून जाण्याची संधी दिली. विशेष म्हणजे क्रोएशियाने बॉल आपल्या नियंत्रणात ठेवण्यात आणि पासिंगमध्ये संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले. मात्र तरी देखील त्यांना फक्त दोन शॉट्स ऑन टार्गेट मारता आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -