शेती करणे झाले कठीण! वाढती मजुरी आणि महागड्या खतांमुळे शेतकरी त्रस्त!

Share

नवी दिल्ली :  पावसाचे वेळापत्रक बदलल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. गरज असते तेव्हा पडत नाही आणि नको तेव्हा मुसळधार कोसळून शेती पिकांची नासाडी करतो. एकिकडे शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्चात दुप्पट वाढ झाल्याने, वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच मजुरी असो वा डिझेलचा खर्च किंवा शेतात लागणारे खत, बी बियाणे, प्रत्येकाचे भाव वाढले आहेत. केवळ शेतीच नाही तर कुटुंब चालवण्यासाठी लागणा-या दैनंदिन वस्तूही महाग झाल्या आहेत. अशा स्थितीत उत्पन्न दुप्पट करण्याचा लाभ शेतक-यांना कसा मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.

जर्मनीची कृषी आधारित कंपनी बायर क्रॉप सायन्सने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील २ हजार ५६ शेतक-यांचा समावेश केला आहे. या सर्वेक्षणानुसार, देशातील ५५ टक्के लहान शेतक-यांनी मान्य केले की, गेल्या काही काळात देशात अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच मजुरीचा खर्चही वाढला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शेती करणे कठीण झाले आहे.

बायरच्या या सर्वेक्षणात, ६० टक्के शेतक-यांनी सांगितले की, भारतात डिजिटल तंत्रज्ञान वाढल्याने शेती करणे सोपे झाले आहे. शेतक-यांच्या मते, भारतात वाढत्या डिजिटलायझेशनमुळे पीक सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे.

यासोबतच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ८ शेतक-यांनी त्यांच्या शेतीशी संबंधित भविष्याबाबत आशावादी असल्याचे सांगितले आहे.

या सर्वेक्षणात ४७ टक्के शेतक-यांनी मान्य केले की महागड्या वीजेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. ३७ टक्के शेतकर्‍यांनी शेतीतील उत्पन्न अस्थिर आहे असे सांगितले आहे. तर ३६ टक्के शेतकर्‍यांनी पीक सुरक्षा हे मोठे आव्हान आहे, असे सांगितले.

यासोबतच या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या ४२ टक्के शेतक-यांनी मान्सूनमध्ये कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा पीक उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली आहे.

Recent Posts

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार! कन्नड शाळांमध्ये चक्क ११ मराठी शिक्षकांची नियुक्ती

नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीने धरला जोर सांगली : सांगली जिल्हा परिषदेचा (Sangli Zilla Parishad) अजब…

7 mins ago

Post Office Scheme : आनंदवार्ता! पोस्टाने आणली ‘ही’ भन्नाट योजना

गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे…

23 mins ago

UPSC exam : गुगल मॅपमुळे रस्ता चुकला; तीन मिनिटे उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला!

यूपीएससी परीक्षार्थींसोबत घडला धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) या विद्यार्थ्यांचे भवितव्य…

32 mins ago

BARC Recruitment : मेगाभरती! भाभा अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी

जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या…

1 hour ago

MHT-CET परीक्षेचा आज लागणार निकाल! जाणून घ्या निकाल कसा व कुठे पाहाल?

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Chamber) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि…

1 hour ago

Nashik Crime : भयानक! नाशिकच्या मंदिर परिसरात सापडली कवट्या आणि हाडे

अघोरी प्रकाराने उडाली खळबळ नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) पंचवटी शहरातून एक अत्यंत भयानक…

2 hours ago