आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये न्यासाचा हात

Share

पुणे : आरोग्य भरती पेपरफुटीसाठी न्यासा ही जबाबदार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणाबाबत आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या पेपरफुटी प्रकरणात सामिल असलेल्या न्यासाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडा भरती परीक्षेआधी एका टोळीचा पर्दापाश करण्यात आला होता. या भरती परीक्षेचा पेपर फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आल्यानंतर आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज या प्रकरणाबाबत आणखी माहिती दिली.

२४ ऑक्टोबर रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते  अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली. गट ‘ड’ चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. गट ‘क’ चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत  सहभागी असलेल्या दोन दलालांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

एका पेपरसाठी हे दलाल पाच ते आठ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.  न्यासा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  न्यासाच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका प्रिंट करताना पेपर फोडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

Recent Posts

LS Polls : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत कडक सुरक्षा तपासणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून,…

13 mins ago

कोपर्डी आत्महत्या प्रकरणी दोन आरोपी अटकेत

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित…

2 hours ago

विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या…

3 hours ago

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

4 hours ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

5 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

6 hours ago