२५ हजाराची लाच घेताना शिक्षणाधिकारी सापडला

Share

पालघर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना एका शिक्षिकेकडून २५ हजारांची लाच घेताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी लता सानप यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकाची बदली करण्यासाठी ही लाच मागितली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. या घटनेमुळे पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु आहे.

पालघरमध्ये शिक्षणाधिकारी लता सानप यांच्या विरोधात अनेक तक्रारी करून त्यांची बदली करावी, यासाठी अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला होता व तो मंजूर झाला होता. जिल्ह्यातील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सानप यांच्या घरात २५ हजारांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतले असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले.

Recent Posts

परीकथा

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?’ या गाण्याने तरुणपणात मला…

5 mins ago

कान्स गाजवणारी कोकणकन्या

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे कोकण ही नररत्नांची खाण आहे असं म्हटलं जातं. तिने ते…

7 mins ago

सुजाण पालकत्व

मनस्विनी - पूर्णिमा शिंदे आपली मुलं हीच आपली संपत्ती! आपण आपल्या मुलांना वाढवताना आपल्यातील चांगले…

18 mins ago

वाराणसीत मोदींचीच जादू…

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघात शनिवारी, १ जून रोजी मतदान पार…

21 mins ago

LS Election : सातव्या टप्प्यातील मतदानाला गालबोट!

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, बिहारमध्ये सर्वाधिक कमी मतदान, आता प्रतिक्षा ४ जूनची नवी दिल्ली : लोकसभा…

2 hours ago

Exit Poll : मोदींची हॅटट्रीक! भाजपा पूर्ण बहूमतासह सत्तेवर येणार

मतदान संपताच विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या एक्झिट पोलचा अंदाज नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी…

2 hours ago