Saturday, April 20, 2024
Homeदेशऐश्वर्या रायला ईडीचे समन्स; अमिताभ बच्चनही रडारवर?

ऐश्वर्या रायला ईडीचे समन्स; अमिताभ बच्चनही रडारवर?

महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनचीही करण्यात आली होती चौकशी

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय दिल्लीतील लोकनायक भवन येथे ईडीसमोर हजर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे ५०० लोकांचा समावेश होता. यातून नेत्यांसह, अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील नावाजलेल्या व्यक्तींची नावं समोर आली. या सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपासात गुंतले आहेत.

पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चन ईडी कार्यालयात पोहोचला होता. यावेळी त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली. असं म्हटलं जातं की, अभिषेक आणि ऐश्वर्यानंतर आता लवकरच अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस बजावणार आहे.

२०१६ मध्ये, यूकेमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे ११.५ कोटींचे कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर यातून जवळपास ५०० जणांची नावं समोर आली आहेत. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना चार कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामामध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होते. हे १९९३ मध्ये तयार केले गेले. या कंपन्यांचं भांडवल ५ हजार ते ५० हजार डॉलर्स दरम्यान होतं, परंतु या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यवधी होती.

ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीचे डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर तिला कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन बेटांवर होते. ऐश्वर्याशिवाय वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील या कंपनीत भागीदार होते. ही कंपनी २००४ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये ही कंपनी बंद पडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -