Share

माेरपीस: पूजा काळे

आपल्या जीवनाला अनेक गोष्टी अर्थ आणत असतात. सुंदर, भव्य स्वप्नांचा अंतर्भाव त्यात असतो. स्वत:ला फुलविण्याची आस म्हणजे आनंददायी स्वप्नांचा ध्यास. स्वप्नील चांदण्यांनी जीवनास अर्थ आला. एक धागा सुखाचा दोघात बांधलेला, असं उगाच नाही म्हणत. आयुष्यातल्या कुठल्याही वळणावर सोबत करतात ही स्वप्न. म्हणायला आपण एकटे वा दुकटे असलो तरी, स्वप्नांचा हिंदोळा घेऊनच फिरतो. खर तरं स्वप्न पाहणं वाईट नाही. तत्ववेत्त्या सुधा मूर्ती यांचे विचार काहीसे असेच. त्यांच्या मते स्वप्न पाहणं चांगलं, पण त्यांना प्रत्यक्षात उतरवणं जास्त चांगलं. असे निर्लेप विचार जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवतात.

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाचं केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा…! इथं नायिका स्वत:च्या स्वप्नांविषयी नकारात्मकता दर्शवित असली तरी, ती स्वप्नं पूर्ण होवोतं अशी तिची इच्छा झाली नाही तर नवल ते काय…? बालपणापासून ते मोठे होईपर्यंत आपल्या स्वप्नांच्या वाटा, त्याची परिपूर्तता वेगळी असली तरी, ती बघणं आपण सोडत नाही. मग ती दिवास्वप्नं असो वा रात्रस्वप्न. त्या जोडीला शिक्षण, उद्योग न करता पोकळ बातांनी ती रंगवणं, म्हणजे वेळ आणि शक्तीचा अपव्ययचं म्हणायला हवा.

हे ज्याला ज्याला कळतं, तो जागतो कर्तव्याला. निशाण फडकवतो कर्तृत्वाचे. नित्य कामाच्या दबडग्यात भागीदार करतो स्वप्नांना. ध्येय उराशी घेऊन जगणारी माणसं ही अशी असतात. स्वप्नं आपली मानसिकता दर्शवतात. जे आपण नेहमी जगतो त्याचा भाग होऊन जगतात किंवा जे जगलेलोचं नाहीत ते जगण्यासाठीचा मार्ग दाखवतात. गंमत असते बघा अशा बहुरूपी स्वप्नांची.

अलवार मनाच्या सांदीकोपऱ्यात निगुतीनं विसावणारी, हितगुज करणारी स्वप्न. दृष्टिपटलावर आभासी जग निर्माण करणारी ही स्वप्नचं. कोणी वाली नसतो त्यांना आपल्या खेरीज. चांगल्या-वाईटाचा पाचोळा घेऊन फिरणारी. यांची एन्ट्री एक्झिट आपल्यावरचं असते. आपणचं आस लावतो नव किरणांची. मग काय…!! रोजचा दिवस केशरिया रंगी होऊन उजाडतो. निशा खुणावू लागते. कोणाला मर्सिडीज हवी असते, तर कोणाला देखणी प्रेयसी, कोण टॉपर होण्याची शिडी चढतो; तर कोणी करोडपती होऊ पाहतो. तालावर नाचवतात ही स्वप्नं. यात आपला पार मृदंग होतो. मग अशा या ताटव्यात सगळेचं बहकतात.

स्वप्नील दुनिया रंगभरी, मनाला देई उभारी. अशा अवस्थेपर्यंत आपण पोहोचतो देखील. अंतर्मनातल्या एका अत्तर कुपीनं सुगंधित करावा आसमंत आणि दरवळावा तिचा गंध. पूर्णत्वाला नेणारी स्वप्नं उभारी देतात मनाला आणि जगणं सुसह्य करतात; परंतु अप्रत्यक्षपणे निचरा न झालेल्या स्वप्नांचं काय? रात्र फारकत घेते या जगताशी. ही करारी स्वप्नं छळतात मानवाला. त्यातून येणारा हुंकार दर्दभरा होतो.

ही दाहकता कवयित्री आपल्या काव्यात रुजवते ती अशी,
कातरवेळी रात्र बिलगते, चंद्र-चांदण दुधात न्हाते. आडोशाला उभे राहुनी,
स्वप्न उशाशी रोज सांडते |
स्वप्नामधले वळण नेमके, पाहण्याचे मी रोज टाळते. सुखाचेही क्षण झेलण्या, दु:खाशी मी रोज भांडते. आडोशाला उभे राहुनी, स्वप्न उशाशी रोज सांडते |
हे सांडलेपण ज्याचं त्याला कळतं. स्वप्नांची स्वप्नांशीचं गाठभेट, निशेलाही उमगली नव्हती. सोसण्या पलीकडे देहाला, काळोखी रात्र बिलगली होती |
करारात बंधिस्त होते स्वप्न, विभागून घेतला होता जीव चांदणं वाटेवरी, भीषण स्वप्नांनी केले निर्जीव!

ही निर्जीवता ग्रहण लावू शकते. तेव्हा या निसरड्या वाटेवर सांभाळून चढलेलं बरं. इथंतर प्रत्येक श्वासाबरोबर, धावणाऱ्या सामर्थ्याशी आणि प्रेरणा देणाऱ्या स्वप्नांशी गाठ बांधिल आहे. तुमचं स्वप्नं किती मोठं यावर पुढे जाऊन तुम्ही किती मोठे व्हाल हे ठरतं. मात्र स्वत:चे मनोरे रचताना, दुसऱ्याच्या स्वप्नांना पायदळी न तुडवण्याइतपत भान असायला हवं. स्वप्नावर जगणारी माणसं, नव्या दमानं उभी राहतात. लढा देतात वास्तवाशी. लाथ मारेन तिथं पाणी काढेनं…! या अर्थानं स्वप्नांनी झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं, या प्रकारच्या जगण्यात जो स्वत:ला झोकून देतो, त्याचं आयुष्यभराचं सोनं होतं.

Recent Posts

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

3 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

3 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

4 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

5 hours ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

5 hours ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

7 hours ago