‘डीआरडीओ’ने तयार केले मानवरहित विमान

Share

बंगळुरू : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (‘डीआरडीओ’) अत्याधुनिक मानवरहित विमान विकसित करण्यात एक मोठे यश मिळाले आहे. ‘डीआरडीओ’ ने ‘ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नोलॉजी डिमॉन्स्ट्रेटर’चे पहिले उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले आहे. वैमानिकाशिवाय उड्डाण केलेल्या या विमानाने उड्डाण करण्यापासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे स्वतः केली. कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये शुक्रवारी हे परीक्षण करण्यात आले.

यासंदर्भातील निवेदनात ‘डीआरडीओ’ने सांगितले की, या वैमानिकरहीत विमानाचे उड्डाण खूप चांगले झाले. हे उड्डाण पूर्णपणे स्वयंचलित होते. यामध्ये टेक-ऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन आणि स्मूथ टचडाउनची चाचणी घेण्यात आली. हे उड्डाण भविष्यात मानवरहित विमानाच्या विकासामध्ये मोलाचे ठरेल. संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ‘डीआरडीओ’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या युएव्हीचे डिझाईन ‘डीआरडीओ’ अंतर्गत बंगळुरू येथील प्रमुख संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (एडीई) तयार केले आहे. त्याचा विकासही एडीईने केला आहे.

हे एक छोटे मानवरहित विमान आहे. यात टर्बोफॅन इंजिन आहे. एअरफ्रेम आणि विमानाची संपूर्ण रचना, चाके, उड्डाण नियंत्रण तंत्रज्ञान आणि एव्हीओनिक्स प्रणालीदेखील पूर्णपणे स्वदेशी असल्याचे सांगितले.

डीआरडीओच्या या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटर संदेशात राजनाथ म्हणाले की, चित्रदुर्ग एटीआरच्या वतीने ऑटोनॉमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल अभिनंदन. ऑटोनॉमस विमाने तयार करण्याच्या दिशेने ही मोठी उपलब्धी असल्याचे राजनाथ यांनी नमूद केलेय.

Recent Posts

Weather Update : पुढच्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी!

नागरिकांना हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने…

13 mins ago

Corona In Maharashtra : सावधान ! महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा फैलाव

केपी २ व्हेरियंटचे पुण्यात ५१ तर ठाण्यात २० रुग्ण मुंबई : जगावरील कोरोनाचे संकट पूर्णपणे…

1 hour ago

PM Narendra Modi : केरळने काँग्रेसला धडा शिकवला; यूपीमध्ये त्यांचं खातंही उघडणार नाही!

दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात लखनऊ…

2 hours ago

Kartiki Gaikwad : लिटिल चॅम्प कार्तिकी झाली आई! बाळाची झलक दाखवत शेअर केली गुडन्यूज

कार्तिकी-रोनितच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन मुंबई : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa…

2 hours ago

Vidhan Parishad Elections : विधानपरिषद निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या!

का घेण्यात आला हा निर्णय? मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल ४ जूनला…

3 hours ago

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी सज्ज; वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज

गंगा पूजन आणि कालभैरवाचा घेतला आशीर्वाद वाराणसीसोबत गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध शेअर करत झाले भावूक…

3 hours ago