विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अजिबात खेळू नका

Share

मुंबई (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. तसेच येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससीमार्फतच घेण्यात याव्यात अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा. उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात, असे रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे.

आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे.

Recent Posts

Jason Holton : ब्रिटनमधील सर्वात वजनदार व्यक्तीचा वयाच्या ३३ व्या वर्षी मृत्यू!

तब्बल ३१८ किलो वजन; अतिरिक्त चरबीमुळे अवयव झाले निकामी लंडन : ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस…

9 mins ago

Chandrashekhar Bawankule : याकुबच्या कबर सुशोभिकरणानंतर आता काँग्रेसला कसाबचा पुळका!

वडेट्टीवारांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी; भाजपला विरोध म्हणून दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळतायत चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार…

38 mins ago

Jay Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जय पवार अंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला

गुपचूप भेटीमागील कारण काय? जालना : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बारामती…

1 hour ago

Nitesh Rane : दोन हिंदुद्वेषी कार्ट्यांसाठी औरंग्याच्या कबरीशेजारीच बांधणार कबरी!

उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना उद्देशून नितेश राणे यांचा घणाघात मुंबई : संजय राऊतने…

2 hours ago

Brazil flood : ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार! ५७ हून अधिक मृत्यू तर हजारो लोक बेपत्ता

ब्राझिलिया : एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा बसत आहे, तर ब्राझीलमध्ये पावसाने धुमाकूळ (Brazil rain) घातला…

5 hours ago

Water Shoratge : राज्यात पाण्याची टंचाई! केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा मुंबई : सध्या राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून पाणी आटत…

5 hours ago