Birds : कुणी घर देता का रे घर? घर माझेच मला…

Share
  • निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

कुणी घर, घर देता का रे? घर? नाटकातील तो आर्त स्वर सर्वांचेच मन हेलावून टाकतो पण… कधी तरी हा स्वर कानी पडतो का? अहो आमचे घर द्या ना, हो आम्हाला परत. अहो माझे घरकुल द्या ना! माझी बाळ वाट बघतायेत, माझी बाळ रडतायेत. कुठे जायचं आम्ही? कुठे राहायचं आम्ही?

कधीच नाही ना कानी पडत, कधीच अंतःकरण हेलावत नाही ना? दुर्दैवाने या पक्ष्यांची भाषा समजण्याएवढे आपण समजूतदार नाही. कारण दुष्ट प्रवृत्ती, स्वार्थ. पावसाळा यायच्या वेळेस लगभग चालू होते वृक्षतोडीसाठी, मोठमोठे वृक्ष बघितले की घाई होते, त्यावर लाईट लावण्याची. पावसाळ्याच्या वेळेस कधीच मनाला विचार शिवत नाही की, त्या दिव्यांच्या माळा वीज प्रवाह बाधा करू शकतील किंवा काही घडू शकेल.

परमेश्वररुपी अद्भुत शक्तीने नैसर्गिक सौंदर्याची या विश्वात उधळणच केली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक घटक निर्मिती झाली आहे. या सजीव सृष्टीला पुनर्जीवन देणारा या पंचतत्त्वातील मूळ घटक वनस्पती. पक्षी हा या सौंदर्य सृष्टीतला एक सौंदर्यवर्धक घटक. या सजीव सृष्टीचा आस्वाद सर्वच घटक घेत असतात, पण याचे संवर्धन करण्याचा विचार मानवाच्या मनात कधीच येत नाही. उत्पत्तीपासून विघटनापर्यंत सर्व काही परिपूर्ण संयोजनात्मक या अद्भुत शक्तीने या विश्वात निर्मित केले आहे. या निसर्गाने प्रत्येकालाच अन्न, निवारा हा शक्तिवर्धक दिलेलाच आहे. याचे ज्ञान मानवाला सोडून, सजीव सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला पूर्णपणे आहे. म्हणूनच ते या निसर्गाचा पुरेपूर उपयोग करतात. आपले अन्न आणि निवारा हे निसर्गाकडूनच घेतात आणि त्यालाच परत देतात. आकाशात उडून मोकळी शुद्ध हवा घेणे, झाडांवरील ताजी फळ, पान, फूल, मध यांचा आस्वाद घेणे. अन्नसाखळीप्रमाणे लहान कीटक, किडे, बेडूक, साप यांचा आहारात समावेश करणे. ऋतू निर्मिती पूर्ण सजीव सृष्टीच्या सशक्तीकरणानुसारच आहे.

पक्षी आपले घरटे बांधण्यासाठी सुद्धा नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करून ऋतूनुसार त्याची निर्मिती करतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात सर्व वृक्षवल्ली सुकतात. पावसाळ्यात पुनर्जीवित होतात. हिवाळ्यात सशक्त होतात. पक्षी आपले आयुष्य नियोजनबद्धपणे जगतात. पक्षी निसर्ग नियमानुसारच आपले घरकुल बनवतात. घरटी बनविताना पर्यावरण बदलाचा अंदाज पक्षी घेतात. घरटी बांधण्यापूर्वी ऋतू, परिसर, अन्न व्यवस्था, संरक्षण सुरक्षितता, घरटी सामग्रीची परिपूर्तता या सर्व गोष्टींचा विचार करूनच घरटी बांधली जातात. निसर्गाकडून घेतात आणि निसर्गालाच परत करतात. उन्हाळ्यामध्ये जेव्हा झाडं, पान, फुलं सुकली जातात, तेव्हा त्याचा पुनर्वापर हे पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी करतात. नैसर्गिक घटकांचे विघटन झाल्यावरसुद्धा त्याचा पुनर्वापर हा या निसर्गामध्ये होत असतो. डहाळ्या, फांद्या, पाने, रेशीम, दगड, चिखल, कोवळे किंवा सुके गवत, नारळाच्या फांद्या, खोडांची वाळलेली तूस या नैसर्गिक गोष्टी घरटी बनविण्यासाठी वापरल्या जातात. या त्या गोष्टी आहेत ज्याचा पुनर्वापर केला जातोय. तो कसा ते मी सांगते. घर सजवण्यासाठी फुले, कीटक, काही रंगीबेरंगी दगड, नरम कोवळे गवत, पिस, कापूस यांचा वापर अंडी आणि पिल्ले यांच्या उबदारपणासाठी नरम गादीसारखा केला जातो. पावसाळ्यात झाडांवर, जाळीमध्ये, बांबू वनात घरटी बांधली जातात. पक्षी फारच हुशार असतात. ते त्यांचे घरटे हे विचारपूर्वक पंचतत्त्वांवर आधारितच कुशलतेने बांधले जाते. पक्षांची घरटी ही खूप क्लिष्ट आणि वैविध्यपूर्ण असतात. कपांच्या आकाराची घरटी, फ्लाय केचर, लार्क, थ्रश, बाब्रलर, बॅटीसेन्स इत्यादी पक्षी बनवतात. वेली, गवत, पिसे, बिया यांनी ते भक्कम करतात. हे घरटे बनवण्याच्या वेळेस कोळ्याचे जाळे, शेवाळे सुद्धा भोवताली वापरले जाते. काही वेळेला चिखलाची सुद्धा घरटी बनवली जातात. शक्यतो ही घरटी झाडांच्या पानांच्या सावलीत बांधतात. वाळूत खड्डा करून झाडांच्या ढोलीत, डोंगरांच्या कपारीत, पानांमध्ये, शहरातील घरांच्या सुरक्षित जागी घरटी बांधली जातात. ही घरटी कॉलनीच्या स्वरुपात सुद्धा असतात. हमिंग बर्डचे सर्वात लहान घरटे असते, तर सर्वात मोठे घरटे गरूड पक्षाचे असते.

सुगरण गवताची पाती, नारळाच्या पानातील तुसं, पान, कापूस यांचा वापर करून झाडांवर लटकणारी घरटी बांधली जातात. जी दोन प्रकारची असतात. ती कायमच सर्वांनी झाडांवर पाहिलेली आहे. घरटी पिल्लांसाठी विस्तार होऊ शकतील, अशी नेहमीच लवचिक असतात. वॉक मार्टिनचे घरटे कधी कधी घराच्या छतावर कोपऱ्यात चिखलाने बनवलेले दिसते. स्क्रॅप घरटी जमिनीवर गोलाकार माती, वाळू, खडी यातून बनवले जाते. आईस्टर कॅचर,प्लवर्स, लॅप् विंग्ज पक्षी अशी घरटी बनवतात. ही घरटी जमिनीवर असल्यामुळे पिल्लं अंड्यातून बाहेर येताना डोळे उघडे ठेवूनच येतात. ही पिल्ले उबवल्यानंतर लगेचच चालतात. जमिनीवर घरटी असल्यामुळे, परमेश्वराने ही योजना त्यांच्या संरक्षणासाठी नैसर्गिकरीत्या केली आहे. २० प्रजाती असणारा बोअर पक्षी मादीसाठी गवताच्या काड्यांचे झोपडीसारखे घर बांधून ताजी फुलं, पानं, चमकदार कीटक, बिया, रंगीत दगड यांनी सजवितो. विशेष म्हणजे पक्षी रोज ताजी फुलं घरट सजविण्यासाठी वापरतो.

चायनामध्ये खाद्य पक्ष्याचे घरटे जो आपल्या तंतुमय धाग्यासारख्या लाळेपासून घरटे बांधतो. जे घरटे पौष्टिक असते. त्यामुळे चायनामध्ये हे खाल्ले जाते. करड्या धनेशाची तर एक गंमतच आहे. उंच झाडावर एखाद्या ढोलीमध्ये मादी अंडी देण्यासाठी आत बसते आणि नर धनेशाने आणलेला चिखल आणि विष्टा यांनी आतून ढोलीचे द्वार लिंपून टाकते. या पक्ष्याचा प्रजनन काळ मार्च ते जून असतो. त्यामुळे अर्थातच बाहेर उष्णता असली, तरी या ढोलीमध्ये गारवा असतो. हे द्वार लिंपताना मादी चोच शिरेल एवढेच छिद्र ठेवते. त्यातून तिला नर धनेश अन्न देत असतो. त्यामुळे अंडी, पिल्लं यांचे संरक्षण होते. पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी स्वतः आतून हे द्वार फोडते आणि स्वतः बाहेर आल्यानंतर परत ते द्वार लिंपून टाकते. पिल्लांना अन्न देता येईल एवढीच फट ठेवते. जोपर्यंत पिल्ले उडण्यासाठी सक्षम होत नाही, तोपर्यंत पिल्लांना नर-मादी खाद्य पुरवतात. जेव्हा ते अन्न मिळवण्यासाठी सक्षम होतात, तेव्हा ते द्वार फोडून पिल्लांना स्वतंत्रपणे उडण्यास देतात. घरटी बनवण्यासाठी पक्ष्यांना साधारणतः दोन दिवस ते दोन आठवडे लागतात. पक्षी प्रजनन आणि अन्नासाठीच स्थलांतरित होत असतात. जिथे अन्न आणि निवारा मिळेल तिथे हे पक्षी कायम आपले वास्तव्य करीत असतात आणि म्हणूनच हे पक्षी नेहमी आपली घरटी सोडून दुसरीकडे जात असतात. कायम नव्याने घरटी बांधत असतात. आश्चर्य म्हणजे कितीही मेहनत करून घरटे बांधले, तरी त्याचा पुनर्वापर हा क्वचितच होतो. प्रत्येक वेळेस पावसाळ्यात नवीन घरटे बांधले जाते. पण माझे निरीक्षण आहे की, सर्वच पक्षी घरटी बांधत नसावेत. जे अंडी देणार आहेत, तेच घरटी बांधतात. नाही तर सर्व झाडांवर पावसाळ्यादरम्यान किती तरी घरटी झाली असती.

जर आपण आध्यात्मिकतेने विचार केला, तर आपल्या घरात घरटे असणे म्हणजे समृद्धी, संरक्षण, प्रेम, सकारात्मकता याचे प्रतीक मानले जाते. घरटे पाहणे हासुद्धा शुभ संकेत मानतात. या पक्ष्यांना नैसर्गिक आपत्ती किती तरी येत असतात. शिकारी पक्षी किती तरी त्यांच्या अंड्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्या पिल्लांना उचलून नेतात. नैसर्गिक आपत्तीला हे पक्षी तोंड देतातच, पण मानवी तुफानाला तोंड कसे द्यायचे? मानवाला देवाने या निसर्गातील सर्व घटकांचे संरक्षण करण्यासाठीच या पृथ्वीतलावर पाठवले असूनसुद्धा मानव हे समजू शकत नाही, हे दुर्दैव म्हटलं पाहिजे.

एकेक गवताची काडी घेऊन, नैसर्गिक संसाधनांचा पुनर्वापर करून, निसर्गातच विलीन होणारी घरटी या अद्भुत पक्ष्यांनी बनवलेली असतात. त्यांचा संसार थाटलेला असतो आणि ही घरकुल मानव स्वतःच्या स्वार्थासाठी किती सहजपणे उद्ध्वस्त करतो. जेव्हा वृक्षतोड होते, तेव्हा मानवाच्या हृदयापर्यंत त्या पक्ष्यांचा टाहो पोहोचत नाही का? बरोबर आहे. या इवल्याशा पक्ष्यांचा टाहो आवाजाच्या स्वरूपात त्याच्या कानांवर पडला, तरीही त्यांच्या रडणाऱ्या हृदयाचा आवाज मानवाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्याएवढा मानव हळवा राहिला नाही. माझं घर मला द्या हो, नका तोडू हो… असं बिचारे कितीही ओरडले, तरीही मानवाच्या या दुष्ट अंत:करणापर्यंत हा आवाज पोहोचतो का? पोहोचेल का?

पावसाचे संकेत देऊन आपल्याला सुखावणाऱ्या, त्सुनामी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची आपल्याला जाणीव करून देणाऱ्या, आपले संरक्षण करणाऱ्या या इवल्याशा जीवांचे संरक्षण करणे आपलेही कर्तव्यच आहे ना.

dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com

Recent Posts

Heatwave in India : देशभरात उष्णतेची लाट; तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचणार! तर काही भागात मुसळधार!

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…

1 hour ago

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

2 hours ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

5 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

6 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

6 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

7 hours ago