मुंबई राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील निवासी डॉक्टरांनी उद्यापासून राज्यातील सरकारी रुग्णालये आणि महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट संघटनेचा आज सकाळी 11 वाजल्यापासून संप सुरू होत आहे, जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा मार्डनं इशारा दिला आहे. सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार आहेत.
डॉक्टरांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा इत्यादी मागण्या केल्या आहेत. दरम्यान, “शक्रवारी सकाळी 11.30 वाजता उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला या विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बोलावलं आहे. परंतु, आम्हाला लेखी अश्वासन हवंय, जे अद्याप आम्हाला मिळालं नाही”, असं मार्डचे सदस्य डॉ. अक्षय यादव यांनी सांगितलं आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…