Monday, June 17, 2024
Homeमनोरंजन'दिल दोस्ती दुनियादारी'मधील हा कलाकार दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत

‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील हा कलाकार दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत

मुंबई: झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी (dil dosti duniyadari) ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतून सहा नवी चेहरे प्रेक्षकांना मिळाले होते. ही मालिका संपल्यानंतर हे सहाही नवे अभिनेते आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला एक अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी (suvrat joshi). सुव्रत लवकरच ‘ताली’ (taali) या वेब सीरिजमध्ये (web series) दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर (instagram) पोस्ट टाकत याची माहिती दिली.

सुव्रत जोशी हा अभिनेत्री सुष्मिता सेन हीची बहुप्रतिक्षित वेब सीरिज तालीमध्ये दिसणार आहे. ही सीरिज ट्रान्सजेंडर गौरी सावंतच्या जीवनावर आधारित आहे. गौरी सावंत ही ट्रान्सजेंडर सोशल वर्कर आहे. त्यांनी आपल्या समाजासाठी अनेक कामे केली आहे. तसेच त्या द्वारे देशात त्यांना ओळखही मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sula (@suvratjoshi)

गौरी सावंत आज ज्या ठिकाणी पोहोचल्या आहेत तेथे पोहोचण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मराठी कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव गणेश नंदन होते. मात्र जेव्हा आपण ट्रान्सजेंडर असल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी ही गोष्ट घरच्यांना सांगितली. तिचे हे बोलणे ऐकून गौरी सावंत यांच्या घरातले प्रचंड नाराज झाले होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले होते. अशातच त्यांची हमसफर या ट्रस्टशी ओळख झाली. त्यांच्या मदतीने गौरी सावंत यांनी मोठे नाव कमावले. त्यांनी एका मुलीला दत्तकही घेतले.

याच गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेब सीरिज आहे. यात सुव्रत जोशी ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने याबाबतचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. १५ ऑगस्टला ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -