धोनीचा दिल्लीविरुद्ध अनुभव कामी आला

Share

सुनील सकपाळ

मुंबई : माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सना हरवून आयपीएल २०२१ हंगामाच्या अंतिम फेरीत धडक मारली. बाद फेरीमध्ये खेळण्याचा सर्वाधिक अनुभव तसेच सीनियर क्रिकेटपटूंचा मोक्याच्या क्षणी उंचावलेला खेळ हे धोनी आणि सहकाऱ्यांच्या नवव्या फायनल प्रवेशाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

प्रतिस्पर्धी चेन्नईसमोरील १७३ धावांचे विजयी लक्ष्य फार मोठे नसले तरी छोटेही नव्हते. फाफ डु प्लेसिस आल्यापावली परतला तरी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (५० चेंडूंत ७० धावा) युएईतील उर्वरित लेगमधील आठ सामन्यांतील दुसरे अर्धशतक ठोकताना सातत्य राखले. केवळ तिसरा सामना खेळणाऱ्या अनुभवी रॉबिन उथप्पाची (४४ चेंडूंत ६३ धावा) मोक्याच्या क्षणी बॅट तळपली. मागील दोन सामन्यांत मिळून केवळ २१ धावा करणाऱ्या उथप्पाने अनुभव पणाला लावताना उर्वरित हंगामातील वैयक्तिक हाफ सेंच्युरी मारली. शिवाय ऋतुराजसह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना डावाची पायाभरणी केली.

उथप्पा बाद झाल्यानंतर अष्टपैलू शार्दूल ठाकूरला प्रमोशन देण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा प्रयत्न फसला. तो खातेही उघडू शकला नाही. अंबाती रायडूही (१) आल्यापावली परतला. त्यातच १९व्या षटकात ऋतुराज बाद झाला. मध्यमगती अवेश खानने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर ११ चेंडूंत २४ धावा असताना अष्टपैलू रवींद्र जडेजा ऐवजी स्वत: बॅटिंगला येत धोनीने त्याचे काम चोख पार पाडले. धोनी आणि मोईन अलीच्या तुलनेत अवेश अननुभवी आहे. त्यामुळे त्याचे काहीच चालले नाही. त्यातच शेवटच्या षटकात कॅगिसो रबाडा ऐवजी सॅम करनला खेळून काढण्याचा धोनीला फायदा झाला. यावेळी करनच्या चेहऱ्यावर टेन्शन जाणवत होते. त्याचा फायदा धोनीने उठवला. सलग दोन चौकारांनंतर करन हतबल ठरला.

दिल्लीकडून मुंबईकर पृथ्वी शॉ (३४ चेंडूंत ६० धावा), कर्णधार रिषभ पंत (३५ चेंडूंत नाबाद ५१ धावा) तसेच अष्टपैलू शिमरॉन हेटमायरने (२४ चेंडूंत ३७ धावा) फटकेबाजी केली. तसेच ५ बाद १७२ धावांची मजल मारली तरी तुलनेत १५-२० धावा कमी पडल्या. टी-ट्वेन्टी लढतीत काहीही होऊ शकते. त्यातच आयपीएलची प्ले-ऑफ फेरी आणि क्वॉलिफायर १ सामना म्हटल्यानंतर प्रत्येक संघ विजयाचाच विचार करणार, हे नक्की असते. तुलनेत बादफेरीत खेळण्याचा अनुभव कमी असूनही रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने चांगले आव्हान उभे केले. मात्र, तुमच्या काही फलंदाजांनी फटकेबाजी केली तर आम्हीही कमी नाही, हे चेन्नईच्या बॅटर्सनी दाखवून दिले.

क्वॉलिफायर १मधील चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान अबाधित आहे. त्यांना आणखी एक सामना (क्वॉलिफायर २) खेळायला मिळेल. त्यात त्यांनी बाजी मारली तर फायनलमध्ये पुन्हा धोनीची टीम समोर असेल. मात्र, पुढील सामन्यात उतरण्यापूर्वी रिषभ पंत आणि सहकाऱ्यांना पहिल्या लढतीतील चुका सुधाराव्या लागतील.

बाप बाप होता है

दिल्ली विरुद्ध चेन्नई लढतीत रिषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाची कसोटी लागली. दोघांनी फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. मात्र, शेवटच्या षटकांत गोलंदाजांचा अचूक वापर करण्यात पंतला अपयश आले. १९व्या षटकात अवेश खानकडे चेंडू सोपवण्याचा त्याचा निर्णय चुकला. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला गोलंदाजीसाठी आणण्याची गरज होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाऐवजी धोनी स्वत: फलंदाजीला आला. त्याला स्वत:वर विश्वास होता आणि आहे. त्यामुळे बेस्ट फिनिशर कायम बेस्ट असतो, हे धोनीने दाखवून दिले. तसेच कुशल नेतृत्वाची झलकही पेश केली.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

4 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

7 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

8 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

8 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

10 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

10 hours ago