मराठी बॉक्स ऑफिसवर ”डार्लिंग”चाच बोलबाला

Share

मुंबई : दुसऱ्या लॉकडाऊननंतर सिनेमागृहांचे दरवाजे उघडल्यानंतर शुभशकून देत प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनंतर ”डार्लिंग” या लव्हेबल चित्रपटालाही प्रेक्षकांचा कौल मिळाला आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर आज ”डार्लिंग”चाच बोलबाला आहे. प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री या ”टकाटक” जोडीचा जलवा थिएटरमध्ये पुन्हा पहायला मिळत आहे. रसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात समीर आशा पाटील दिग्दर्शित ”डार्लिंग” या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अ स्ट्रेस बस्टर फॅमिली एन्टरटेनर हि ”डार्लिंग”च्या पोस्टरवर देण्यात आलेली टॅगलाईन मराठी सिनेरसिकांनी खरी ठरवली आहे. ”डार्लिंग”ला मिळणाऱ्या प्रतिसादाचं संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या टिमनं रसिक मायबाप यांना दिलं आहे.

लॉकडाऊनमुळं प्रेक्षकांच्या भेटीपासून दुरावलेला ”डार्लिंग” अखेर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये ”डार्लिंग”च्या गाण्यांवर रसिक अक्षरश: तल्लीन होऊन नाचत असल्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. २५० हून सिनेमागृहांमध्ये ३००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला ”डार्लिंग” पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हडपसर, खर्डा, रहाटणी, नारायणगाव, तळेगाव, नाशिक, लातूर, नांदेड, अकलूज, अमरावती, खान्देश, चिंचवड, सोनाई, कामोठे, गोरेगाव, वाळूंज, औरंगाबाद, सिटिप्राईड अभिरूची येथे रविवारी हाऊसफुलचे बोर्ड झळकले.

प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला निखिल चव्हाणनं साकारलेला राजभाऊही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातील काही तरुणांचं प्रतिनिधीत्व करणारा असल्यानं तोदेखील लक्ष वेधून घेत आहे. टायटलवरून जरी हा चित्रपट केवळ प्रेमकथा असल्यासारखा वाटत असला तरी मूळात हा फॅमिली एन्टरटेनर असल्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे. अखेरपर्यंत खिळवून ठेवणारं कथानक, पूर्वार्धात केलेली व्यक्तिरेखा आणि पटकथेची बांधणी, उत्तरार्धात त्याला जोडलेली इमोशनची किनार, तंत्रशुद्ध दिग्दर्शन, कलाकारांचा सशक्त अभिनय, प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी केलेलं अचूक कास्टिंग, सुमधूर संगीत, नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफी आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये अशी एक ना अनेक कारणं ”डार्लिंग”ला चहू बाजूंनी परफेक्ट बनवणारी आहेत. तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ताल धरायला लावण्याची क्षमता ”डार्लिंग”च्या गाण्यांमध्ये असल्याचं चित्र महाराष्ट्रभर पहायला मिळत आहे. चित्रपटातील कलाकारांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आणि शहरांमध्ये जाऊन प्रमोशन करताना केलेल्या आवाहनाला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यानं ५० टक्के आसनक्षमता असूनही अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

6 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

6 hours ago