दरेकर, तुम्ही मजूर आहात का?

Share

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin darekar) यांनी मुंबई बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस (Notice) बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे.

यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. दरम्यान आताही त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. पण याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.

तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना २१ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सहकारी बँकांमधील (Co-operative bank) कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेककडून प्रयत्न केले जातात. मात्र, राजकारण्यांकडून या नियमांना सोईस्कररित्या बगल दिली जाते. मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत याचे तंतोतंत प्रत्यंतर येताना दिसत आहे.

जानेवारी महिन्यात मुंबै बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांनी हा अर्ज मजूर संस्था प्रवर्गातून दाखल केला आहे. त्यामुळे कोट्यवधींची संपत्ती असलेले प्रवीण दरेकर ‘मजूर’ कसे ठरु शकतात, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत आहे.

Recent Posts

RCBच्या विजयाने किती बदलले पॉईंट्स टेबल? जाणून घ्या समीकरण

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने(royal challengers bangalore) दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी हरवले. या पद्धतीने फाफ डू…

2 hours ago

२० रूपयांच्या चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते, उत्तर ऐकून खाणे सोडाल

मुंबई: बाजारात विकली जाणारी चिप्सची पाकिटे बाहेरून दिसायला जितकी रंगीबेरंगी असतात तितकीच ती आरोग्यासाठी धोकादायक…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: १० राज्ये, ९६ मतदारसंघ, चौथ्या टप्प्यासाठीच्या मतदानाला सुरूवात

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. चौथ्या टप्प्यात १० राज्ये…

4 hours ago

RCB vs DC: बंगळुरुच्या बालेकिल्यात दिल्लीचा अस्त, तब्बल ४७ धावांनी दिली शिकस्त…

RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकत बंगळुरुला फलंदाजीला…

12 hours ago

PM Modi: पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास

पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला. आधी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी…

12 hours ago

हा आहे Samsungचा सर्वात स्वस्त 5G फोन, ९ हजारांपेक्षा कमी किंमत

मुंबई: स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर Samsung Galaxy F14 5G हा…

13 hours ago